व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Jeevan Bhalerao : परदेशातून पदवी घेत आईवडिलांचे स्वप्न केले साकार; हिंजवडी येथील ‘जीवन’चा कुंभार समाजातील युवकांपुढे नवा आदर्श

अत्यंत खडतर परिस्थितीत परदेशात जाऊन जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर जीवन यांनी हे यश मिळविले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 28, 2025
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Jeevan Sanjeev Bhalerao from Hinjewadi received his MBBS degree from Russia

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : हिंजवडी येथील प्रसिद्ध अध्यापक आणि कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस संजीव बाबूराव भालेराव यांचे सुपूत्र जीवन भालेराव यांनी रशिया येथून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत परदेशात जाऊन जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर जीवन यांनी हे यश मिळविले आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

कुंभार समाज हा महाराष्ट्रातील एक लहान समाज आहे. परंतु सामाजिक घटकात त्याचे स्थान महत्वाचे आहे. खडतर परिस्थितीत या समाजातील मुले शिक्षण घेऊन पुढे येत आहेत. डॉ. जीवन भालेराव हे याचेच एक उदाहरण आहे. जीवन यांनी मिळविलेल्या यशाने कुंभार समाजातील मुलांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.

याबद्दल कुंभार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सभापती सतीश दरेकर, कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, पुणे जिल्हा कुंभार समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष बाबाजी कुंभार यांनी जीवन आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच श्री संत गोरोबाकाका गणपती विक्री स्टॉल मंडळ डांगे चौक थेरगाव या मंडळांच्या सभासदांनीही डॉ. जीवन यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व त्यांच्या आई-वडिलांचे देखील अभिनंदन केले.

आई-वडिलांकडून ज्ञानदानासह समाजसेवा
डॉ. जीवन यांच्या यशात त्यांचे आई-वडील वर्षा भालेराव आणि संजीव भालेराव यांच्या संघर्षाचा मोलाचा वाटा आहे. वर्षा भालेराव व संजीव भालेराव हे दोघेही गेली 25 वर्षांपासून हिंजवडी, चांदखेड याठिकाणी ‘जय कोचिंग क्लासेस’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण करीत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, सायकल यांची मदत करतात, सोबत शुल्क भरण्याची अडचण असलेल्या मुलांना मोफत शिक्षण देऊन सामाजिक सेवा करीत आहेत. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी सीआयडी, आयपीएस, पीएसआय, तलाठी आदी शासकीय पदावर काम करीत आहे. यानंतर आता त्यांचा स्वतःचा मुलगा देखील परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर झाला असून हा त्यांच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.

हिंजवडी : डॉ. जीवन भालेराव याचा सत्कार करताना श्री संत गोरोबाकाका गणपती विक्री स्टॉल मंडळ, डांगे चौक – थेरगाव मंडळाचे सदस्य.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर


Previous Post

आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बस सोडणार ; ग्रुप बुकींग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी मिळणार

Next Post

तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Police committed to keeping Talegaon MIDC industrial area free from fear PC Vinay Kumar Choubey assures

तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.