लोणावळा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरीची घटना घडली आहे. लोणावळ्यातील टाटा धरणाजवळील नौसेना बाग इथे घराच्या खिडकीतून प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी तब्बल सव्वापाच लाखांच्या सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. ( Jewelery worth five lakhs stolen in Lonavala city )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सोमवारी (दिनांक 26 जून) ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी राजेंद्र जयकिसन मगनलाल (वय 58, रा. मॉन्सून कॉटेज, बंगला नं. 2, नौसेना बाग, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या बेडरूमची खिडकी उघडून प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले 11.5 तोळे सोने, हिऱ्याची अंगठी असे एकूण सव्वा पाच लाखांचे दागिने लंपास केले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा शहराजवळील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी वर्षाविहारासाठी जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, थेट 144 (1) केलाय लागू
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनचालक आणि प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, लगेच वाचा