Dainik Maval News : मावळ तालुक्यात काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने येथे मोठी चुरस पाहायला मिळेल. अशात या गटातून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा पंचायत समिती मावळचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी हे निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असून त्यांच्या उमेदवारीबद्दल काले-कुसगांव गटात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांनंतर लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजेल, अशी चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षण देखील जाहीर झाले असून जिल्हा परिषद गटांत आणि पंचायत समिती गणांत इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. काले – कुसगांव जिल्हा परिषद गटात ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी यांनी जोरदार तयारी केली असून कार्यकर्त्यांच्या पाठबळाच्या जोरावर आणि पक्षश्रेष्ठींच्या विश्वासावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर ठाम आहेत.
पूर्वीपासूनच पवन मावळ विभागात चांगला जनसंपर्क असलेले ज्ञानेश्वर दळवी यांनी गावभेट संवाद दौऱ्यातून जनसंपर्काची आपली नाळ अधिक घट्ट केली आहे. तसेच काले गणासह कुसगांव गणात भाजपा कार्यकर्त्यांचे असलेले मोठे जाळे आणि त्याला श्री. दळवी यांच्या चाणाक्ष नेतृत्वाची साथ यांमुळे भाजपाच्या गोटातही माऊली दळवी यांच्या उमेदवारीबद्दल विश्वास आणि विजयाची आशा आहे. तसेच सर्वपक्षीयांसोबत दळवी यांचे चांगले संबंध असल्याने भाजपाकडून दळवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यास कार्यकर्त्यांना समर्थकांनाही विजयाचा विश्वास वाटत आहे. तसेच सामान्य मतदारही श्री. दळवी यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक असल्याने ही गोष्टीा पक्षश्रेष्टी नजरेआड करू शकत नाही.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननी अंती महायुतीचे चार उमेदवार बनले बिनविरोध नगरसेवक
– कोकण आणि मावळातून आळंदी वारीसाठी येणाऱ्या पायी दिंड्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
– “लोणावळा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी 5 कोटींना विकली” ; सूर्यकांत वाघमारे यांचा गंभीर आरोप । Lonavala
– आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ । Ladki Bahin Yojana
