Dainik Maval News : भजन करून दुचाकीवरून घरी जात असताना भरधाव कारने धडक दिल्याने नायगाव येथील चोपडे दाम्पत्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. शनिवारी (दि. 5 ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला होता. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या अंधारात हा अपघात घडल्याने कार चालकाचा शोध घेणे हे मोठे आव्हान कामशेत पोलिसांपुढे होते. मात्र पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील काळ्या रंगाची थार चारचाकी गाडी शोधणे आव्हानात्मक होते. सदर हीट अँड रन प्रकारात क्लिष्ट व किचकट तपास प्रक्रिया पार पाडून कामशेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणाचा तपास करीत अपघात केलेली थार गाडी ताब्यात घेऊन त्यावरील चालक आरोपी राहुल श्रीशैल बिराजदार (रा. जिजामाता चौक तळेगाव दाभाडे) यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीला न्यायालय समक्ष हजर करून पोलीस कोठडीची मागणी करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेडगे करीत आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मायणे, पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेडगे, पोलीस उपनिरीक्षक अब्दुल शेख, पोलीस हवालदार गणेश तावरे, जितेंद्र दीक्षित, सुहास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननवरे, गवारी, प्रतीक काळे, होमगार्ड लालगुडे, बोंबले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; वडगावमधील वैष्णवी म्हाळसकर हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
– वंदन दुर्गांना । संस्काराच्या सुपीक जीवनवाटेवर तिने कष्टाचं पाणी ओतलं, श्वासासोबत नृत्य जोडून स्वातीताई बनलीये शास्त्रीय नृत्यांगना
– वाईन शॉपचे लायसन्स देण्याच्या बहाण्याने महिलेची 40 लाखांची फसवणूक, तळेगावमधील प्रकार । Talegaon Dabhade