Dainik Maval News : कामशेत पोलिसांनी मुंढावरे गावात रॉकेलचा अवैध साठा जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथक, पंच आणि पुरवठा निरिक्षक यांनी छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मुंढावरे गावात इंद्रायणी ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत केमिकलचा व पांढरे रॉकेलचा अवैध साठा केल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी छापा टाकला. सदर ठिकाणी २ लाख ८८ हजार सहाशे रुपये किमतीचा २८ बॅलरमध्ये ४८१० लिटर ज्वलनशील केमिकल सदृश्य तसेच पांढरे रॉकेल सदृश्य पदार्थाचा साठा अवैधरित्या करुन ठेवलेला मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून महेंद्र काळुराम चौधरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, सहाय्यक फौजदार नितेंद्र कदम, पोलीस हवालदार समीर करे, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, निशा लालगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway

