Dainik Maval News : जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशान्वये शिवकालीन ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने ‘किल्ले बनविणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील बहुसंख्य शाळा आणि गावांनी यात सहभाग घेऊन आपापल्या गावाने जपलेला ऐतिहासिक वारसा प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कान्हे गाव आणि आदर्श केंद्र शाळा कान्हे यांनी देखील स्पर्धेत सहभाग घेवून छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेला किल्ले शिवनेरी गडाची उत्कृष्ठ, हुबेहुब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गडावरील सर्व ठिकाणे दाखविली आहे. यासह शिवकालीन खेळ, कलाकुसर, भांडी, नाणी-नोटा, हत्यारे यांचे प्रदर्शन यांचा समावेश केला.
कान्हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा बसवून त्याभोवती सुंदर बाग निर्मितीचे काम हाती घेतले आहे. शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास रेखाटण्यात आला आहे. कान्हे शाळेने बनविलेला शिवनेरी किल्ला आणि गावाने जपलेला ऐतिहासिक ठेवा याचे मूल्यांकन करीत मावळ तालुक्यातून शाळेला द्वितीय क्रमांकाचे 50 हजाराचे बक्षीस जाहीर झाले आहे.
शाळेच्या आणि गावाच्या यशाबद्दल पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याकामी विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्र प्रमुख निर्मला काळे, सरपंच विजयराव सातकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर सातकर, आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे यांनी विशेष सहकार्य केले. शाळेतील शिक्षक दादासाहेब खरात, अजित नवले, नवनाथ सांगळे, संगीता मधे, अक्षता अंब्रुळे आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘शिवदुर्ग मित्र’चे संस्थापक अध्यक्ष सुनिल गायकवाड यांना पितृशोक
– कान्हे येथील महाआरोग्य शिबिराचा शनिवारी शेवटचा दिवस, आतापर्यंत 40 हजाराहून अधिक मावळवासियांनी घेतला लाभ
– पावसाने मोडला रेकॉर्ड : लोणावळ्यात यंदा 5822 मिमी पाऊस, गेल्या 24 तासात तब्बल 155 मीमी पाऊस । Lonavala Rain