Dainik Maval News : कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आरपीआय, एसआरपी या युतीच्या उमेदवार दिपाली दीपक हुलावळे तसेच पंचायत समितीच्या कार्ला गणातील उमेदवार रेश्मा राजु देवकर व खडकाळा गणातील उमेदवार समीर जाधव यांच्या प्रचाराने आता चांगलाच जोर पकडला आहे.
प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडून तीनही उमेदवारांचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत असून मतदार सर्व उमेदवारांना विजयाचा निर्धार देत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाकसई ग्रामपंचायतमधील संत तुकाराम चाळ या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांचे पती व पंचायत समितीचे माजी सभापती दीपक हुलावळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करीत संपूर्ण गावाचा त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला.
आमदार सुनील आण्णा शेळके यांनी या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला असल्यामुळे या गावाचा पूर्ण पाठिंबा हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना असल्याची यावेळी सांगण्यात आले. खडकाळा पंचायत समिती गणामध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिपाली दीपक हुलावळे व पंचायत समितीचे उमेदवार समीर जाधव या दोघांच्या प्रचारार्थ रंगोली हॉटेल या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी एक मुखाने दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस एक करण्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार सुनील शेळके यांनी विकासाची गंगा मावळ तालुक्यामध्ये आणली, त्यांचे शिलेदार म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीला सामोरे जात असलेल्या उमेदवार यांना देखील मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून देऊ व मावळ तालुक्याच्या विकासाचे आम्ही देखील साक्षीदार म्हणून असा विश्वास नागरिक या प्रचारादरम्यान व्यक्त करत आहेत.
कामशेत येथील पार्वती फर्निचर या नवीन दालनाचे देखील उद्घाटन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व पंचायत समिती चे सदस्य दीपक हुलावळे यांच्या हस्ते करण्यात आले. कामशेत गावांमधून राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. राजकारणासाठी राजकारण नाही तर समाजकारणासाठी राजकारण व पदाच्या माध्यमातून या परिसराचा सर्वांगीण व शाश्वत विकास हाच आमचा ध्यास असल्याचे यावेळी बोलताना दीपक हुलावळे यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– चांदखेड पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनिता मनोज येवले यांच्या प्रचारार्थ आमदार सुनील शेळके यांची रॅली
– साहेबराव कारके हे मावळ पंचायत समितीचे उपसभापती होणार – आमदार सुनील शेळके
– कुसगांव बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ, आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भव्य रॅली
– कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !