येत्या 22 जानेवारी रोजी हिंदू धर्मियांचे अराध्य प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिर लोकार्पण सोहोळा अयोध्येत होणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम त्यांच्या अयोध्येतील मंदिरात विराजित होणार आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ शहरातही दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या पवित्र मंगलमय दिवशी वडगाव शहरात मांस व मद्य विक्री दुकाने बंद ठेवावी, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शहर (शरद पवार गट) यांच्या वतीने पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव शहरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिवशी मांसाहार विक्री आणि मद्य विक्री केंद्र बंद ठेवणे बाबत वडगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम आणि वडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मिञ पक्ष यांच्या वतीने गुरुवारी (दि. 18) निवेदन देण्यात आले. ( keep meat and liquor shops closed on 22nd January vadgaon maval ncp letter to administration )
वडगाव शहरातील आणि परिसरातील भागात राम मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहार विक्री आणि मद्य विक्री होऊ नये, सदर दुकानदार बांधवांना नगरपंचायत प्रशासन मार्फत आणि पोलीस स्टेशन मार्फत दुकाने बंद ठेवण्यास विनंती करावी, अशा आशयाचे निवेदन वडगाव शहर राष्ट्रवादीकडून देण्यात आले. यावेळी राजेश बाफना, अतुल राऊत, विशाल वहिले, बारकू ढोरे, आफताब सय्यद, सोमनाथ धोंगडे, अनिल ओव्हाळ, बाळासाहेब शिंदे, पंकज भामरे, विशाल सुराणा, पप्पू सोळंकी, राहील तांबोळी आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा संपन्न; संजोग वाघेरे हेच मावळ लोकसभेचे उमेदवार? । Maval Lok Sabha
– मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महामार्गावर 6 तासांचा ब्लॉक, लगेच वाचा । Mumbai Pune Expressway
– मावळमधील कान्हे गावात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महाशिबिराचे उद्घाटन । Maval News