केरळ राज्य सरकारने सोमवारी ( दिनांक 16 जानेवारी) एक ऐतिहासिक निर्णय घेतला. केरळमधील सर्व विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसात सुट्टी घेता येणार आहे. महत्वाचे म्हणडे कोचिन विद्यापीठाने याआधीच अशाप्रकारची सुट्टी जाहीर केली होती. केरळ सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत आणि कौतूक होत असून महाराष्ट्रतही असा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत असून जितेंद्र आव्हाड यांनी तसे ट्विट सुद्धा केले आहे. ( Kerala Government Allow Menstrual Leave For Students In All State Universities )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे.ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे.महाराष्ट्र सरकारने देखील असाच निर्णय आपल्या राज्यातील विद्यार्थिनी,महिला शासकीय कर्मचारी यांच्यासाठी घ्यावा,अशी मागणी मी @mieknathshinde आणि @Dev_Fadnavis यांच्याकडे करतो.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2023
केरळचे उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी या निर्णयाची घोषणा केली. मासिक पाळीच्या काळात महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्या सगळ्याचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे मंत्री आर बिंदू यांनी सांगितले. ‘मासिक पाळीचे दिवस हे महिलांसाठी अत्यंत भावनिक उतार चढावाचे दिवस असतात. त्यामुळे या काळात त्यांनी आराम केलेला चांगला असतो’, असे मंत्री आर बिंदू यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा –
– ‘गाव तिथे शाखा – घर तिथे शिवसैनिक’, मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंपर्क गाव भेट दौरा! कुरवंडे गावातून शुभारंभ
– मोठी बातमी! मावळ विधानसभेच्या मनसे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर, थेट राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान, पाहा संपूर्ण यादी
– ‘प्राधिकरणाने बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी परवागी द्या’ – खासदार श्रीरंग बारणे