पवनानगर (प्रतिनिधी : धर्मेंद्र ठाकर) खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांच्या शेतावर मशागतीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुका कृषी विभाग व मंडळ कृषी अधिकारी कार्यालय काळेकॉलनीच्या वतीने पवनमावळ भागात गावोगावी भात पिक पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे व रोपवाटिका गादी वाफ्यावर तयार करणे, चारसूत्री लागवड, फळबाग लागवड संदर्भात मोहीम राबविली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मळवंडी ठुले येथे कृषि विभागामार्फत शेतकऱ्यासाठी खरीप हंगाम सभा घेण्यात आली. सभेमध्ये शेतकऱ्यांना कृषिसहाय्यक विकास गोसावी यांनी घरगुती भात बियाण्यास 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बिजप्रक्रिया, रासायनिक जैविक बिजप्रक्रिया, चारसूत्री लागवड, मग्रारोहयो फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, कृषि यांत्रिकीकरण महाडिबीटी प्रणाली वर अर्ज करणे, कृषि विभागाच्या योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ( Kharif Season Farmers Meeting concluded at Malwandi Thule Maval Taluka )
गादीवाफा रोपवाटिका करताना –
गादी वाफे तयार करताना तळाशी 4 फूट व वाफ्यावर 3 फूट रुंदीचे आणि 8 ते 10 से. मी उंचीचे व क्षेत्रानुसार लांबीचे बनवावेत. एक एकर भात लागवडीसाठी चार गुंठ्याची रोपवाटिका पुरेशी होते. भाताच्या तुसाची राख रोपवाटिका तयार करताना मातीत मिसळली तर रोपाना सिलिकॉन उपयुक्त अन्नद्रव्य मिळते व रोपे निरोगी जोमदार येतात. गादी वाफा एक गुंठा क्षेत्रासाठी एक किलो युरिया,3 किलो सिंगल सुपर फॉसफेट, 85 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 15:15:15 ही खताची मात्रा द्यावी.रोपवाटिका तण नियंत्रण करणे साठी गादी वाफे पावसाने ओले झाल्यावर व बियाणे उगवण्यापुर्वी “गोल ” या तणनाशकाची एक मिली एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोपे 21 दिवस वयाची झाली की पुनरलागवड करावी असे कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले
मळवंडी येथे शेतकरी सभेस प्रगतशील शेतकरी प्रदीप देशपांडे, अनंता बेनगुडे,किसन ठुले,अप्पा आमले, गणेश तोंडे, वसंत पवार, भाऊ तोंडे, दत्ता तोंडे, रोहिदास ठुले, बाळू ठुले, बाबजी सुतार, सुरेश शिंदे, सुभाष तोंडे, बाबुराव उदेकर, बाळू पवार, मारुती उदेकर,योगेश राक्षे,मधू ठुले,अंकुश ठुले, हरिभाऊ ठुले,प्रथमेश देशपांडे, ज्ञानेश्वर ठुले, रामदास शिंदे,रामदास ठुले उपस्थित होते
गादीवाफा रोपवाटिका फायदे :
– रोपवाटिकेत तण नियंत्रण व आंतरमशागत करणे सोपे जाते.
– जमिनीच्या वर वाफ्याला उंची असल्यामुळे रोपांच्या मुळाजवळ हवा खेळती राहते त्यामुळे रोपांची वाढ चांगली होते.
– पाण्याची पातळी समप्रमाणात राहते त्यामुळे रोपे तजेलदार व जोमदारपणे वाढतात.
– रोपवाटिकेत खत व्यवस्थापन व किड रोग नियंत्रण करणे सोपे जाते.
– रोपांच्या पुनर्र लागवडीसाठी गादी वाफ्यावरून रोपे सहज काढता येतात.
विकास गोसावी (कृषि सहाय्यक, शिळींब)
अधिक वाचा –
– मावळात 4 जून पूर्वीच उधळला गुलाल ! पाटण गावच्या सरपंचपदी ‘यांची’ बिनविरोध निवड । Maval News
– मावळात मुलांपेक्षा मुलीच हुशार ! दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात मुलींनीच मारली बाजी । SSC Result Maval Taluka
– जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ झालेल्या ‘त्या’ अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय !

