खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांच्या शेतावर मशागतीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने पवनमावळ भागात गावोगावी भात पिक पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणेसंदर्भात मोहीम राबविली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मळवंडी ठुले खरीप हंगाम मार्गदर्शन सभा घेण्यात आली. गावातील शेतकऱ्यांनी या सभेला चांगला प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना भातपिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषि अधिकारी दत्तात्रय गावडे व कृषि विभागाच्या विविध योजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषि अधिकारी विकास गोसावी यांनी केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जे शेतकरी घरगुती भात बियाणे पेरणीसाठी वापरतात, त्यांनी मीठाच्या 3 टक्के द्रावणाची बीजप्रक्रिया करावी, त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मिठाचा वापर करावा. यानंतर प्रथम शेतकऱ्यांनी रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करुन 3 ते 4 तासांनी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जीवाणू (पीएसबी) या जीवाणू खताची बीजप्रक्रिया करावी व नंतर अशा पध्दतीने संस्करण केलेले बियाणे हे गादीवाफा तयार करुन रोपवाटिकेवर पेरावे, असे आवाहन कृषी अधिकारी दत्तात्रय गावडे व कृषी सहायक विकास गोसावी यांनी केले आहे. ( kharif season guidance meeting for farmers in malvandi thule village by maval agriculture department )
मळवंडी ठुले येथील खरीप हंगाम सभेस उपसरपंच ज्ञानेश्वर तुकाराम ठुले, ग्रामपंचायत सदस्य वसंत ठुले, प्रगतशील शेतकरी किसन ठुले, ज्ञानेश्वर बेनगुडे, एकनाथ राक्षे, बबन पवार, शाबू ठुले, आबू ठुले, भगवान ठुले, प्रदीप देशपांडे, वसंत पवार, यशवंत बेनगुडे, ज्ञानेश्वर ठुले, अंकुश ठुले, बाळू पवार, बाबुराव उदेकर, अंनता बेनगुडे, संतोष ठुले, संजय आमले, गोरखनाथ शिंदे, रामदास ठुले भाऊ मोहोळ, बाळू पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कृषिसहायक विकास गोसावी व प्रदीप देशपांडे यांनी केले.
हेही वाचा – पवना धरणातील जलसाठ्यात मोठी घट! पावसाने दडी मारल्यास पाणीकपातीचे संकट, पाहा सध्याचा पाणी साठा
बीजप्रक्रियेचे फायदे – (कृषी सहाय्यक – विकास गोसावी)
- जमिनीतुन व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो
- बियाण्यांची उगवणक्षमता वाढते
- रोपे तजेलदार व जोमदारपणे वाढतात
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते
- बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो
“खरीप हंगाम मार्गदर्शन सभेचा आमच्या गावातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. आम्ही सगळे शेतकरी बीजप्रक्रिया, गादीवाफ्यावर रोपवाटिका, दोरीत लागवड, युरिया ब्रिकेट खताचा वापर करणार आहोत. कृषि विभाग शेतकऱ्यांसाठी कायमच कार्यरत आहे.” (प्रदीप देशपांडे – प्रगतशील शेतकरी, मळवंडी ठुले)
अधिक वाचा –
– ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील 3 हजार 68 नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा लाभ
– निगडे येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन; निगडे, कल्हाटसह पाच गावातील नागरिकांना दिलासा