जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “सौभाग्यवती 2023” खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड ह्या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला आघाडी आणि भाजपा मावळ तालुका महिला अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे आणि नाणे मावळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा सुषमा स्वराज अवार्ड आयुवेदाचार्य डॅा. मालविका तांबे आणि युवा कीर्तनकार हभप जयश्री येवले यांना प्रदान करण्यात आला. ( Khel Rangala Mahilancha In Maval Taluka Vaishnavi Rasal Became Lucky Winner Of 2023 Womens Got Huge Prizes )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खेळ रंगला महिलांचा या कार्यक्रमात सौभाग्यवती 2023 च्या मानकरी ठरल्या वैष्णवी चंद्रकांत रसाळ. त्यांना सोन्याचे मंगळसूत्र, शिलाई मशीन आणि मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक गंगुबाई चिंधु मराठे यांना सोन्याची नथ, शिलाई मशीन आणि मानाची पैठणी, तृतीय क्रमांक सविता अनिल दाबणे चांदीचे पैंजण, शिलाई मशीन, मानाची पैठणी, चतुर्थ क्रमांक अर्चना नवनाथ पडवळ चांदीचा छल्ला, मानाची पैठणी आणि शिलाई मशीन तसेच पंचम क्रमांक रेखा दत्तात्रेय वारूडे चांदीची जोडवी, शिलाई मशीन आणि मानाची पैठणी देण्यात आली.
तसेच यावेळी उपस्थित महिला भगिनींकरिता लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या संगीता मोहिते यांना इलेक्ट्रिक दुचाकी गाडी देण्यात आली. द्वितीय क्रमांक उषा मधुकर पडवळ यांना फ्रिज देण्यात आला. तृतीय क्रमांक कविता दळवी यांना 32 इंची एलईडी टीव्ही देण्यात आला. चतुर्थ क्रमांक सीता शिळवणे यांना पिठाची गिरणी देण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये मुख्य आकर्षक महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याकरिता दहा शिलाई मशीनचे लकी ड्रॉ पद्धतीने वाटप करण्यात आले आणि सर्व उपस्थित महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
खेळ रंगला महिलांचा या कार्यक्रमाचे सादर करते सुप्रसिद्ध निवेदक अभिनेते संदीप पाटील यांनी केले. महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध प्रकारचे खेळ मंचावरती घेतले याला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– महाराष्ट्रात आता महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत, योजनेची अमंलबजावणी सुरू
– ब्रेकिंग! तळेगाव दाभाडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा निवृत्त नर्सची राहत्या घरी आत्म’हत्या, परिसरात खळबळ