Dainik Maval News : दत्ताभाऊ गुंड युवा मंच मावळ आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आयोजित खेळ रंगला पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा हा खास कार्यक्रम मंगळवार, दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. येळसे ( ता. मावळ ) येथील शहीद कांताबाई ठाकूर मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खास महिला भगिनींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सध्या काले कुजगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटात चांगली चर्चा आहे. आरजे अक्षय हे अँकरिंग करणार असून कार्यक्रम मध्ये प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
महिला वर्गासाठी महा लकी ड्रॉ मध्ये तब्बल दहा दुचाकी आणि अन्य बक्षीस जिंकण्याची संधी स्पर्धकांना असणार आहे. प्रत्येक सहभागी महिला भगिनींसाठी खास गिफ्ट म्हणून साडी देखील देण्यात येणार आहे. दुचाकी, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, मोबाईल, शिलाई मशीन, मिक्सर अशी अनेक बक्षीस जिंकण्याची संधी महिला भगिनींसाठी असणार आहे.
काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातील काले गणासाठी हा खास कार्यक्रम दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांनी आयोजित केला असून कार्यक्रम स्थळी येण्यासाठी प्रत्येक गावातून महिलांकरिता वाहनाची व्यवस्था देखील केली आहे. महिलाभगिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे महिला भगिनींना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मोकळा वेळ आनंदाने घालवता येणार आहे.
दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहिलेले दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जवळपास निश्चिती झाली असून दत्तात्रय गुंड या दूरदूरचे दूरदृष्टीच्या व प्रामाणिक कार्यकर्त्याच्या उमेदवारीबद्दल जिल्हा परिषद गटातही सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले
