वडगांव मावळ येथे दि ७ ते १० मार्च दरम्यान राजे शिव छत्रपती जयंती महोत्सवाची सांगता मोठ्या थाटामाटात आणि विविध कार्यक्रमांनी झाली. या महोत्सवाचे हे ४४ वे वर्ष होते.
बुधवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला भगिनींचा आवडता स्पर्धात्मक कार्यक्रम खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यात सुमारे ४५० महिला भगिनींनी यांत सहभाग नोंदवला होता. अरिहंत कलेक्शन्स आणि हिरा गोल्ड यांच्या वतीने विजेत्यांना मानाची पैठणी , सोन्याची नथ आणि चांदीचा छल्ला तसेच सहभागी सर्व महिलांना राणीताई संतोष म्हाळसकर यांचे वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. ( Khel Rangala Paithanicha Raje Shiv Chhatrapati Jayanti 2023 Celebrated In Vadgaon City Of Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संध्या पोले या पैठणीच्या विजेत्या ठरल्या तर सलोनी मोतीबने व सीता वाघमारे यांनी अनुक्रमे सोन्याची नथ आणि चांदीचा छल्ला पटकावला. महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ, राजमाता जिजाऊ महिला मंच संस्थापक सारिका भेगडे, मावळ तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सायली बोत्रे, इंदोरी उपसरपंच लतिका शेवकर आदी उपस्थित होत्या. चित्रा वाघ यांनी या प्रसंगी आपल्या मनोगतात महिला भगिनींचे सक्षमीकरण होणे काळाची गरज असल्याचे नमूद केले. सारिका भेगडे, सायली बोत्रे यांचेही मनोगत याप्रसंगी व्यक्त झाले.
वडगांव शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा धनश्री भोंडवे, मा उपसभापती दिपाली म्हाळसकर, मा उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर, नगरसेविका दिपाली मोरे, पूनम दिनेश ढोरे, संगीताताई ढोरे, वैशालीताई ढोरे, पूनम संतोष ढोरे, पुजा पिंगळे, भक्ती जाधव, अर्चना कुडे, वैशाली म्हाळसकर, अश्विनी म्हाळसकर, सोनाली म्हाळसकर, कांचन म्हाळसकर, पूनम म्हाळसकर, सपना म्हाळसकर, श्रेया भंडारी, सुनंदा म्हाळसकर, सुवर्णा गाडे, नीलम म्हाळसकर आणि सर्व महिला संयोजन समितीने आयोजन केले.
अधिक वाचा –
– वडगावात शिवजयंतीनिमित्त हभप गौरीताई सांगळे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न, हजारो श्रोत्यांनी घेतला कीर्तनसेवेचा लाभ । Vadgaon Maval
– राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव निमित्त वडगावात जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, पाहा विजेत्यांची यादी । Vadgaon Maval