श्री विठ्ठल परिवार मावळ आयोजित भव्य कीर्तन महोत्सवाला सोमवारी, दि. 1 जानेवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कीर्तनापूर्वी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या उत्सव सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी पंचक्रोशीतील हजारो महिला पुरुष भाविक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. सोमवारी कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री (पारनेर) यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. श्री विठ्ठल परिवार मावळ, कीर्तन सप्ताह मैदान – कामशेत इथे हा कीर्तन सोहळा दिनांक 5 जानेवारीपर्यंत रंगणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या कीर्तन महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. किर्तन महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून कामशेत येथे साजऱ्या होणाऱ्या भव्य कीर्तन महोत्सवात यावर्षीही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची दररोज सायंकाळी सहा वाजता सुश्राव्य कीर्तने होणार आहेत. मावळातील कानाकोपऱ्यातून विशेषत: ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत असतात. या कार्यक्रमासाठी कामशेत येथील मैदानात भव्य मंडप पार्कींग व्यवस्थेसह उभारण्यात आला आहे. ( Kirtan festival organized by MLA Sunil Shelke Shri Vitthal Parivar Maval at Kamshet )
सोमवार, 1 जानेवारीला एकनाथ महाराज चत्तर, मंगळवार 2 जानेवारीला विशाल महाराज खोले, बुधवार 3 जानेवारीला बाळू महाराज गिरगावकर, गुरुवार 4 जानेवारीला योगीराज महाराज गोसावी तसेच कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार 5 जानेवारीला अक्रूर महाराज साखरे यांचे सकाळी 10 ते 12 यावेळेत काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन किर्तन श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अधिक वाचा –
– ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी; ग्रामीण भागात यात्रेला 4 लाख नागरिकांची भेट
– श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : अयोध्येतील अक्षता पोहोचणार घराघरात, पिंपरी चिंचवड शहरात महाअभियान । Ram Mandir Ayodhya
– ब्रेकिंग! थर्टी फर्स्टची पार्टी जीवावर बेतली, इंद्रायणी नदी पात्रात बुडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू । Talegaon News