जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी ( Kishor Aware Murder case ) एक ट्विस्ट समोर आला आहे. किशोर आवारे यांच्या हत्येमागे स्वतः माजी नगरसेवक भानू खळदे यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तळेगाव नगर परिषदेसमोर दिनांक 12 मे रोजी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत प्रमुख सुत्रधार म्हणून भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेसह 7 जणांना अटक केली आहे. परंतू आता भानू खळदे हेच या प्रकरणाचे मास्टर माईंड आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे.
वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदे याने ही हत्या घडून आणल्याचे आतापर्यंत पोलिस तपासात समोर आले. मात्र, आता भानू खळदे यांनीच हे सर्व घडवून आणले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. या घटनेत हत्या करणाऱ्यांमध्ये सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधार भानू खळदे असल्याचा संशय पोलिसांना आहे. ( Police suspect that Bhanu Khalde is mastermind behind the murdered )
याबाबत विशेष तपास पथकाच्या प्रमुख सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या की, ‘आवारे खून प्रकरणात भानू खळदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस पथके भानू खळदे याच्या शोधासाठी पाठवण्यात आली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील.’
अधिक वाचा –
– दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येकाने ही बातमी नक्की वाचा, 24 मे हा दिवस असणार अत्यंत महत्वाचा
– तुमच्याकडेही 2 हजारच्या नोटा आहेत का? असल्यास ‘या’ पद्धतीने लावा त्या नोटांचा निकाल, जाणून घ्या सविस्तर