वेहेरगाव येथील नागरिकांसाठी मनसेचे अशोक कुटे यांच्या मार्फत दिनांक 19 ते 20 मे अशा दोन दिवसीय मोफत आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. नवीन आधार निर्मिती, आधार दुरुस्ती यासह आधार अपडेट अशा आधारसंबंधित विविध सेवांचा गावातील आणि परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वेहेरगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. गावातील आणि परिसरातील नागरिकांनी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास शंभरहून अधिकांनी या सेवेचा लाभ घेतला. ( Free Aadhaar Seva Camp at Vehergaon Karla Maval Taluka )
अनेक नागरिकांची कागदपत्रांअभावी आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती करता आली नाही, त्यांच्यासाठी जुन महिन्यात पुन्हा एकदा कॅम्प घेण्यात येईल. तसेच पुढील आठवड्यात मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती अशोक वसंतराव कुटे यांनी दिली.
अधिक वाचा –
– शाळा सुधारणा ते आदिवासी वस्त्यांचा विकास, आमदार शेळकेंकडून ‘या’ कामांसाठी भरीव निधीची मागणी
– दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येकाने ही बातमी नक्की वाचा, 24 मे हा दिवस असणार अत्यंत महत्वाचा