Dainik Maval News : देशातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका, स्त्री उद्धारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती न्यु आघाडी ग्रुप व श्री संत सावतामाळी महाराज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सावित्रीमाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे, दिन दुबळ्यांना ज्ञानी बनवणे यासाठी महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या या मौलिक कार्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन मंडळाकडून करण्यात येत असते.
कार्यक्रम प्रसंगी प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीमाईंच्या जीवनाचा खडतर क्रांतीकारी प्रवास विद्यार्थ्यांपुढे मांडला. शाळेचे शिक्षक, प्रसिद्ध शिवव्याख्याते तुकाराम केदार यांनी आपल्या व्याख्यानातून सावित्रीमाईंच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध पैलूंवर सखोल प्रकाश टाकला. शाळेची विद्यार्थिनी आरोही अमित शिंदे हीने सावित्रीमाईंच्या वेशभूषेत ‘मी सावित्री बोलते’ या एकांकिकेचे सादरीकरण केले.
याप्रसंगी तळेगाव वि.वि.कार्य.सोसा. संचालक एकनाथराव भुजबळ, कामगार नेते सा.का. रामचंद्र जगताप, पोलिस पाटील महेश शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाथा लोंढे, मा.उपसरपंच स्वप्निल भुजबळ, न्यु आघाडी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अंकुश शिंदे, युवा नेते संकेत जगताप, सा.का. स्वप्निल शिंदे, जेष्ठ नागरिक म्हातारबा लोंढे, अनिकेत जगताप, सचिन लोंढे, उमेश भोसले, गणेश जगताप, ऋतिक जगताप, मयुरी भुजबळ, शाळेचे मुख्याध्यापक कोळेकर सर, अंगणवाडी सेविका लिंभोरे मॅडम, मदतनीस प्रियंका शिंदे, सोनाली लोंढे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक आडकर सर यांनी तर शिक्षीका प्रियंका शहापूरकर मॅडम यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News