व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट

ॲड. पु.वा. परांजपे विद्यामंदिर शाळेमध्ये डिजिटल स्कूल उपक्रमांतर्गत सर्व वर्ग खोल्यांमध्ये बसविण्यात आलेल्या डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डचे उद्घाटन.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 3, 2025
in लोकल, शहर
Gift of Digital Interactive Smart Board to Paranjape Vidya Mandir School in Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा वाढता प्रभाव लक्षात घेता मराठी माध्यमांच्या शाळा स्मार्ट व डिजिटल बनवणे काळाची गरज ठरत असल्याचे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केले. महिंद्रा एक्सिलो वराळे चाकण यांच्या सी.एस.आर फंडातून येथील ॲड. पु.वा. परांजपे विद्यामंदिर शाळेमध्ये डिजिटल स्कूल उपक्रमांतर्गत सर्व वर्ग खोल्यांमध्ये बसविण्यात आलेल्या डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतोष खांडगे बोलत होते.

यावेळी महिंद्रा एक्सिलो वराळे चाकण कंपनीचे संजय सोनकुमार, लक्ष्मण महाले, प्रसाद पादिर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, यादवेंद्र खळदे, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर, अशोक काळोखे, विलास पानसरे, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे, इंदोरी शाळेचे मुख्याध्यापक रेवाप्पा शितोळे, पैसाफंड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता लादे, निराली मॅडम, संदिप पानसरे, लक्ष्मण मखर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना खांडगे म्हणाले की, शिक्षण क्षेत्राची बदलती ध्येय व केंद्रस्थानी असणारा विद्यार्थी वर्ग यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान यांची ओळख व विविध तंत्र कौशल्य हाताळण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्ययनामध्ये हे स्मार्ट बोर्ड निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत.

यावेळी लक्ष्मण महाले म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी बदलत्या तंत्रज्ञानापासून वंचित राहू नये. यासाठी शाळांमध्ये तंत्रज्ञानाशी निगडित अनेक साधने व साहित्यांचा उपयोग अध्ययन अध्यापनात करणे क्रमप्राप्त ठरत आहे. कंपनीच्या सीएसआर फंडातून डिजिटल इंडिया स्मार्ट बोर्ड यांच्या माध्यमातून विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये लक्षणीय भर पडली आहे.

यावेळी संजय सोनूकुमार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय नेत्यांच्या विचारातून साकारलेल्या शिक्षण संकुलामध्ये आम्हाला हे करण्याची संधी मिळाली हे आमचे सद्भाग्य आहे. महात्मा गांधीजींनी सांगितलेले आहे, खेड्याकडे चला. खरा भारत देश हा ग्रामीण भागातून विकसित झाला तरच भविष्यामध्ये भारत हा महासत्ता बनेल. त्यासाठी वर्तमान काळातील विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घेता येईल अशा तंत्रज्ञानाची ओळख आणि ज्ञान असणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे व सुवर्णा काळडोके यांनी केले. आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News
– कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade
– चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News

Next Post

मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pimpri-Chinchwad-Police

मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.