Dainik Maval News : भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुका अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड पाटील हे कुसगांव बुद्रुक – काले गटातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाऊसाहेब गुंड यांनी कुसगांव-काले जिल्हा परिषद गटात गावभेट संवाद दौरा सुरू केला असून त्यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
नुकताच ( दि. 27 नोव्हेंबर) भाऊसाहेब गुंड यांनी काले – कुसगाव जिल्हा परिषद गटातील राऊतवाडी, लोखंडवाडी, करुंज, बेडसे, कडधे, येळसे, शिवती आणि पवनानगर या गावांत गावभेट दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात गावांतील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला. याप्रसंगी सर्वच ठिकाणी श्री. गुंड यांचे ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात स्वागत केले.
सदर दौऱ्यात भाऊसाहेब गुंड यांनी गावातील विकासकामांचे निरीक्षण करून ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच नागरिकांच्या अडचणी, गरजा आणि कामांसंदर्भातील सूचना जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या सर्व सूचनांना आणि अपेक्षांना आपण पूर्ण न्याय देऊ, तसेच गावचा विकास साध्य करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन विश्वासाने पुढे जाऊ, अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब गुंड यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना दिली.
भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी असणारे भाऊसाहेब गुंड हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ आणि सामान्य नागरिकांची विश्वासपूर्वक साथ मिळताना दिसत आहे. सर्वपक्षीयांसोबत असलेले उत्तम संबंध आणि विकासाची दृष्टी यातून दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड हे काले – कुसगांव गटातील प्रभावी उमेदवार म्हणून समोर येत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…

