Dainik Maval News : विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना ठरली, व महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले.
लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे. दरमहा आर्थिक लाभ देणारी योजना म्हणून तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका निश्चित करण्यासाठी देखील ही योजना महत्त्वाची आहे.
- या योजनेअंतर्गत पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) सक्षम बँक खात्यात दरमहा 1 हजार 500 रूपये इतकी रक्कम दिली जात आहे. तसेच केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1 हजार 500 रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येतात.
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा उत्पन्न असणाऱ्या महिला लाभासाठी पात्र आहेत. 2 लाख 50 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असेल त्यांनी उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता नाही.
आतापर्यंत किती पैसे जमा?
महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जुलै 2024 पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे एकूण 13,500 रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे. एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नेमके कधी पैसे जमा होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला होता. 7 एप्रिल पासून हे पैसे देण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ताही 7-8 तारखेला मिळणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number