Dainik Maval News : सुलभ नैसर्गिक प्रसूतीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडून हाती घेण्यात आलेल्या ‘लज्जा गौरी मोहीम’ अंतर्गत मावळ तालुक्यातील माळेगाव येथे सामुदायिक डोहाळे जेवण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चौदा गर्भवतींचा सहभाग नोंदवला होता.
आपल्या पूर्वजांनी नैसर्गिक प्रसूतीसाठी आडवे न झोपता उभ्याने किंवा पायाच्या चवड्यावर बसून प्रसूती करण्यासाठीचे तंत्रज्ञान आत्मसात केले होते. त्यालाच ‘लज्जा गौरी’ म्हणून संबोधण्यात येते.
मावळातील ग्रामीण भागात अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सामाजिक सहयोग उपक्रम संस्था (कॅप-कम्युनिटी एड प्रोग्रॅम) आणि नर्सिंग कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने गर्भवतींना प्रसूतीकाळी होणारा त्रास सुसह्य होण्यासाठी जन जागरण मोहिमेद्वारे विशेष प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी कर्ते स्त्री शिक्षण संस्थेच्या नर्सिंग कॉलेज आणि सेवधाम ट्रस्टच्या नर्सिंग कॉलेजमधील आरोग्य सेविकांनी गर्भवतींना नैसर्गिक प्रसूती संदर्भात प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागात घरी प्रसूती करणाऱ्या दाईनी आपले अनुभव सांगितले. सहभागी गर्भवतींचे औक्षण करण्यात आले. त्यांना दोन साड्या भेट देण्यात आल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठीच भाजपाचे कार्यकर्ते काम करतील ; सुनिल शेळके यांनी व्यक्त केला विश्वास
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– बापूसाहेब भेगडे हे मावळातील जनतेचे उमेदवार, त्यामुळे परिवर्तन अटळ – रामदास काकडे