व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

"२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मावळचा आमदार दीड लाखांच्या लीडने येईल, तोही राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल"

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 16, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एकूण १५ पैकी १५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने विजय मिळविला. या विजयानंतर वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन आज (दि.१६) करण्यात आले होते.

या मेळाव्यात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांवर अर्थात भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केले. ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली काही भाजपा नेत्यांनी उमेदवारांकडून २५ ते ३५ लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप आमदार शेळके यांनी केला आहे.

तसेच, या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांकडून चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. “कोणीही माझ्यामुळे मोठे झाले असे वाटत असेल तर २०२९ ला माझ्या विरोधात उभे राहा,” असे आव्हान देत शेळके यांनी आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचे स्पष्ट केले.

नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, मात्र वैयक्तिक कार्यक्रमांपेक्षा जनतेच्या कामांना प्राधान्य द्या, असा स्पष्ट संदेश दिला. दर आठवड्याला होणाऱ्या जनता दरबाराला हजर राहणे बंधनकारक असल्याचेही सांगितले.

“पक्षाचे काम हे घरचे काम नसून जनतेची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. येणाऱ्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मावळचा आमदार दीड लाख मताधिक्याने विजयी होईल आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यास माजी मंत्री मदन बाफना, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला.

निवडणुकीतील भव्य यशानंतरही आनंदोत्सव टाळून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– शेतजमिनीवर बांधकामासाठी अकृषक (एन.ए.) परवानगीची अट रद्द, बांधकाम आराखडा हीच परवानगी ; जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा
– राज्यात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती, नव्या पद्धतीने होणार भरती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– महाशिवरात्रीसाठी श्री भीमाशंकर मंदिर बंद राहणार ; भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकासकामे वेगात सुरू
– लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् फेरफटका मारायला गेला.. प्रसिद्ध कलाकाराच्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू


Previous Post

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.