व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचे! पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात, जमीन मालकांना आतापर्यंत 2 हजार 625 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road News

पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या पुणे चक्राकार मार्गाच्या ( पुणे रिंग रोड ) भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 5, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Ring-Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या पुणे चक्राकार मार्गाच्या ( पुणे रिंग रोड ) भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या प्रकल्पासाठी अत्यंत वेगाने भूसंपादन करण्यात यश आले असून आतपार्यंत पश्चिम चक्राकार मार्गाच्या भूसंपादनासाठी 2 हजार 625 कोटींचा मोबदला भूधारकांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे रिंग रोडच्या निर्णयाचा इतिहास –
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या तसेच कोल्हापूर, सासवड, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, माणगाव, कोकण व मुंबई या भागातून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून जावे लागते. त्यामुळे शहरांतर्गत वाहतूकीवर त्याचा ताण पडत आहे. शहरात वाहनांची संख्या वाढल्याने हवेचे व ध्वनीचे प्रदुषणदेखील वाढले आहे. बाहेरून येणारी वाहने शहराच्या आत न आणता बाहेरून योग्य त्या दिशेला वळविण्याकरीता शहराबाहेरून चक्राकार महामार्ग काढणे आवश्यक असल्याने शासनाने 14 जुलै 2015 रोजी पुणे शहराभोवती चक्राकार मार्ग बांधण्याचा शासनाने निर्णय घेतला.

ह्या प्रकल्पाकरीता अंमलबजावणी यंत्रणा म्हणून शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला नियुक्त केले आहे. हा प्रकल्प पूर्व व पश्चिम अशा दोन टप्प्यात विभागला आहे. प्रकल्पाची आखणी अंतिम झाल्यानंतर पूर्व व पश्चिम चक्राकार महामार्गासाठी भूसंपादनाच्या प्राथमिक अधिसूचना 2021 मध्ये प्रसिद्ध झाल्या. प्रकल्पासाठी आवश्यक मोजणीला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. कोरोना संकटाचा कालावधी असतानाही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधून त्यांना प्रकल्पाचे महत्व समजावून सांगितले. भूसंपादनामुळे होणारा आर्थिक लाभ भूधारकांना समजावून सांगण्यात यश आल्याने संयुक्त मोजणीचे काम अल्पावधीत पूर्ण करण्यात आले.

महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 6 तालुक्यातील सुमारे 84 गावातून जमीन संपादन करणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी विविध प्रकारच्या बाधीत होणाऱ्या जमिनीसाठी दर निश्चिती करण्यात आली. नंतरच्या काळात मुल्यांकनासंदर्भात शासनाने 24 जानेवारी 2023 रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिलेल्या सुचनेनुसार निश्चित केलेले दर रद्द करून नव्याने दर निश्चिती करण्यात आली. असे करताना भूधारकांचे समाधान योग्यप्रकारे होईल याचीदेखील दक्षता घेण्यात आली. ( Land acquisition work of Pune Ring Road in final stage Latest News Of Pune Ring Road Updates )

रिंग रोडचे पूर्ण आणि पश्चिम असे भाग –
नवीन दरानुसार मोबदला निश्चिती करून पहिल्या टप्प्यात पुणे (पश्चिम) चक्राकार मार्गाच्या एकूण 32 गावांतील भूधारकांना संमतीचे विकल्प दाखल करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या. भूधारकांनी संमती दिल्यानंतर त्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला प्राप्त होण्यासाठी सर्व भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्वतंत्र भूसंपादन कक्ष कार्यान्वित करण्यात आले. पश्चिम चक्राकार मार्गातील मावळ, मुळशी, हवेली व भोर तालुक्यातील संपादित करावयाच्या सुमारे 645 हेक्टर जमिनीपैकी 307 हेक्टर क्षेत्र संमतीने घेण्यात आले. उर्वरीत क्षेत्राचे भूसंपादनाचे निवाडे जाहीर करण्यात येवून प्रकल्पाकरिता जमीन हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

पूर्व चक्राकार मार्गातील मावळ, खेड, हवेली, पुरंदर व भोर तालुक्यातील एकूण 48 गावांतील दर निश्चिती पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी खेड तालुक्यातील 12, मावळ तालुक्यातील 6 व हवेली तालुक्यातील 5 गावांतील मोबदला निश्चिती करून मोबदला वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पुणे चक्राकार मार्गासाठी संपादनाकरीता 2 हजार 625 कोटी रुपये रक्कमेचा मोबदला भूधारकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.

  • पुणे जिल्ह्यातील आजवर झालेल्या सार्वजनिक प्रकल्पांच्या भूसंपादनाकरीता वाटप करण्यात आलेल्या मोबदल्यापेक्षा हा सर्वाधिक मोबदला आहे. शासनाच्या मुल्यांकनासंदर्भातील नवीन परिपत्रकानंतर केवळ एक वर्षाच्या आत भूसंपादनाची प्रथम टप्यातील कार्यवाही ज्यात संयुक्त मोजणी वहिवाटीप्रमाणे करणे, दर व मोबदला निश्चिती, भूधारकांचे समुपदेशन करून जास्तीत जास्त संमतीचे विकल्प घेणे, संमती विकल्पानुसार मोबदला वाटप करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. यासाठी नियुक्त समितीच्या नियमितपणे बैठका, कार्यशाळा घेण्यात आल्या.

गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत या संपूर्ण कार्यवाहीला डॉ. देशमुख यांनी वेग दिला आहे. या प्रक्रियेत संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, महसूल विभाग, पाणी पुरवठा विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विविध विभागांनीही या प्रकल्पासाठी चांगले सहकार्य केले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून लवकरच पुणे चक्राकार मार्गाचे काम निविदा प्रक्रीयेनुसार हाती घेण्यात येणार आहे. ( Land acquisition work of Pune Ring Road in final stage Latest News Of Pune Ring Road Updates )

अधिक वाचा –
– मावळमधील ‘या’ 10 गावात अंगणवाडी इमारतीसाठी निधी उपलब्ध; 11 अंगणवाड्यांसाठी तब्बल 1 कोटी 23 लाखांचा निधी, वाचा सविस्तर । Maval News
– मावळच्या शिवली गावातील आदेश आडकरची वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई, माथ्यावर फडकवला भगवा ध्वज!
– ‘राज्यभर नमो महारोजगार मेळावे, मुंबईत मालमत्ता कर वाढ नाही ते पतसंस्थांना मजबूत करणार’, शिंदे सरकारचे मोठे निर्णय, वाचा एका क्लिकवर


Previous Post

मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक : अवैध उमेदवारी अर्ज आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेबाबत महायुतीच्या नेत्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

Next Post

मावळ तालुक्यासह पिंपरी शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश! ‘या’ नेत्यांच्या हाती खासदार बारणेंनी बांधले शिवबंधन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-loksabha-shivsena

मावळ तालुक्यासह पिंपरी शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश! 'या' नेत्यांच्या हाती खासदार बारणेंनी बांधले शिवबंधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.