व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यासह पिंपरी शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश! ‘या’ नेत्यांच्या हाती खासदार बारणेंनी बांधले शिवबंधन

मावळ तालुका आणि पिंपरी शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवबंधन बांधून कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 5, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
maval-loksabha-shivsena

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका आणि पिंपरी शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवबंधन बांधून कार्यकर्त्यांचे स्वागत केले. पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल. कोणावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी खासदार बारणे यांनी दिली. खासदार बारणे यांच्या थेरगाव येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ह्या प्रसंगी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मावळ तालुका युवसेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे, चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष बारणे, शहर संघटक युवासेना निलेश हाके उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी उपशहर प्रमुख चंद्रशेखर देवरे, त्याचे सहकारी, राष्ट्रवादीचे निलेश वाघमारे व त्याचे सहकारी, ठाकरे गटाचे गट शाखाप्रमुख दिपक शेरखाने, दापोडी मनसे शाखा अध्यक्ष गणेश काटे, सामाजिक कार्यकर्ते अजय कदम, महेंद्रे पोकळे कुष्ठ पिडीत समाज सामाजिक कार्यकर्ते सचिन कोष्टी, फुगेवाडी सामाजिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश जाधव, शिवशक्ती भीमशक्ती मंडळाचे अध्यक्ष मनोज कांची व त्याचे सहका-यांनी प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. ( many leaders of maval taluka pimpri city joined shiv sena party mp shrirang barane welcomed )

खासदार बारणे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर, कार्यक्षमतेवर विश्वास ठेऊन इतर पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सामाजिक कार्यकर्तेही शिवसेनेत येत आहेत. शिवसेनेत प्रवेशाचा ओघ सुरू आहे. मावळ, पिंपरी-चिंचवडमधील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. युवक शिवसेनेशी जोडले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित नुकताच किवळे येथे पक्षाचा मेळावा झाला. नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युवकांनी जोमाने कामाला लागावे.

रविवारी माझ्या मावळ दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत केले आणि जोमाने कामाला लागा, असे त्यांना सांगितले. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा वर्ग मोठ्या संख्येने शिवसेनेशी जोडला जात आहे, याचा आनंद आहे.… pic.twitter.com/Ss9SA14dlD

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) February 5, 2024

अधिक वाचा –
– ‘छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा राज्यभर निषेध करणार’, कुणी केलीये मागणी? काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
– मावळमधील ‘या’ 10 गावात अंगणवाडी इमारतीसाठी निधी उपलब्ध; 11 अंगणवाड्यांसाठी तब्बल 1 कोटी 23 लाखांचा निधी, वाचा सविस्तर । Maval News
– मावळच्या शिवली गावातील आदेश आडकरची वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई, माथ्यावर फडकवला भगवा ध्वज!


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाचे! पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात, जमीन मालकांना आतापर्यंत 2 हजार 625 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road News

Next Post

मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? साहेबांचा की दादांचा? निवडणूक आयोगाने दिला अंतिम निकाल, लगेच वाचा । EC Settles Dispute In NCP

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sharad-Pawar-Ajit-Pawar

मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? साहेबांचा की दादांचा? निवडणूक आयोगाने दिला अंतिम निकाल, लगेच वाचा । EC Settles Dispute In NCP

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.