Dainik Maval News : मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्यावर मंगळवारी (दि. १ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात आले. मावळ भूषण, शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी (दि. 30 जुलै) रोत्री नऊच्या सुमारास वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. मंगळवारी तळेगाव मधील बनेश्वर स्मशानभूमी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रूनयनांनी कृष्णरावजी भेगडे यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला.
अंत्यविधीसाठी मावळ, खेड, मुळशी, हवेली, इंदापूर आदी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातेवाईक मंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार लांडगे, माजी आमदार राम कांडगे, माजी आमदार विलास लांडे, आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे, माजी मंत्री बाळा भेगडे, बापूसाहेब भेगडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष गणेश खांडगे, गणेश काकडे, किशोर भेगडे आदी मान्यवर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
तळेगाव शहर आणि विविध संस्थांच्या वतीने ॲड रवींद्र दाभाडे यांनी श्रद्धांजली वाहिली. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांनीही श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण जिल्ह्यात भेगडे साहेबांनी आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटवला, असे प्रदीप गारटकर यांनी सांगितले.
आमदार सुनील शेळके यांनी, साहेबांचे नेहमीच मार्गदर्शन मिळाले. मावळ तालुक्यात आदिवासी शाळा तसेच आयटीआय सुरू करून तालुक्याला नवी दिशा दिली. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असल्याचे सांगितले. माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार रामभाऊ कांडगे यांनीही श्रद्धांजली वाहिली. माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी, गुरुस्थानी असलेले व्यक्तिमत्व आजकाळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away
– “कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक