वडगाव शहरात महिला भगिनींसाठी वर्षभराकरिता कायमस्वरूपी घरगुती स्वयंरोजगाराचा शुभारंभ करण्यात आला. मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या संकल्पनेतून मोरया महिला प्रतिष्ठान च्या माध्यमातून आणि नगरसेविका पूनम खंडेराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थित या स्वयंरोजगाराचा करण्यात आला. यावेळी पंचमुखी मारुती मंदीर प्रांगणात महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रशिक्षक नजीर शेख यांनी महिला भगिणींना अतिशय सोप्या पद्धतीने प्रशिक्षणाचे मार्गदर्शन केले. ( Launch Of Permanent Domestic Self Employment For Women In Vadgaon City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आजच्या युगात महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी हे एकदिवसीय प्रशिक्षण महिलांसाठी मोफत ठेऊन महिलांना आत्मनिर्भर होण्याआठी अतिशय मोलाचे व उपयुक्त ठरणार आहे. वडगाव शहरातील महिला भगिनींना घरातील दिवसभराचे सर्व काम उरकून निवांत असलेल्या वेळेत छोटे छोटे आकाश कंदील बनवणे हा घरगुती पद्धतीचा स्वयंरोजगार येत्या पाच मार्चपासून सुरू करण्यात येणार असून यातून महिला भगिणींना नक्कीच समाधानकारक असे मानधन मिळेल असा विश्वास नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने नगरसेविका पूनम जाधव यांनी व्यक्त केला.
आजच्या प्रशिक्षणात महिलांनी छोटे आकाश कंदील बनवणे ही एक वर्षभरासाठी कायमस्वरूपी संकल्पना आहे. यात महिला भगिनी स्वतः घरगुती स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण करू शकतात. यावेळी सुमारे साडेतीनशे ते चारशे महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. स्वयंरोजगार प्रशिक्षण शुभारंभ प्रसंगी नगरसेविका पूनम जाधव, मोरया महिला प्रतिष्ठानचे सल्लागार यशवंत शिंदे, तसेच प्रतिष्ठानच्या जयश्री जेराटागी, सुषमा जाजू, विजया माळी आणि संचालिका, सदस्या तसेच वडगाव शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम! वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून जिल्हा परिषदेच्या शाळांना उन्हाळ्यात गारव्यासाठी पंखे भेट
– आश्विनी जगताप यांच्या विजयानंतर कामशेत इथे भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडत वाटली मिठाई