सोमाटणे-परंदवडी रोडवर बगॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने अपघात घडल्याची घटना घडली आहे. संत तुकाराम साखर कारखान्यातून बगॅस घेऊन हा ट्रॅक्टर भरधाव वेगाने निघाला होता. यावेळी ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने सदर अपघात घडला. शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. ( Tractor Accident On Somatne Parndavadi Road In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सोमाटणे-परंदवडी रोडवर खांडगे पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. ट्रॅक्टरला एकास एक अशा दोन ट्रॉल्या जोडल्या होत्या. त्यामुळे अत्यंत अवजड बनलेले हे वाहन भरधाव वेगाने निघाले होते, तेव्हा खांडगे पेट्रोल पंपाजवळ अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला कलंडले. यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र, साखर कारखान्याचे ट्रॅक्टरची भरधाव वेगाने होणारी वाहतूक हा मुद्दा पुन्हा चर्तेत आला आहे.
अधिक वाचा –
– वडगाव शहरात महिला भगिनींसाठी वर्षभराकरिता कायमस्वरूपी घरगुती स्वयंरोजगाराचा शुभारंभ
– स्तुत्य उपक्रम! वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून जिल्हा परिषदेच्या शाळांना उन्हाळ्यात गारव्यासाठी पंखे भेट