Dainik Maval News : पवन मावळ विभागातील किल्ले लोहगड परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. मागील आठवड्यात शनिवारी (दि. 17 ऑगस्ट) दुधीवरे येथील खिंडीजवळ बिबट्या दिसला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि. 22 ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास नागरिकांना लोहगड खिंडीजवळ बिबट्या दिसला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
किल्ले लोहगड, किल्ले विसापूर ह्या परिसरात दाट वनराई आहे. तसेच हा भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने, तसेच पवना धरण परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी पवनानगर ते लोणावळा प्रवास करताना हा एकमेव मार्गावरून जावे लागते. अशात रात्रीच्या सुमारास रस्त्यावर बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
परिसरातील लहानसहान गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, नागरिकांनी शक्यतो रात्रीचा या भागातून प्रवास टाळावा, एकट्याने बाहेर जाणे टाळावे, घराजवळील गोठ्यात पिवळ्या प्रकाशाचा बल्ब लावावा, घराजवळ खराब अन्न टाकू नये, बाहेर पडताना टॉर्च, काठी सोबत ठेवावी, बिबट्या हा त्याच्यात अधिवासात असून घाबरून जाउ नये, अशा सुचना वनविभागाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा –
– ‘प्रत्येकीला सन्मानाची वागणूक देणाऱ्या आण्णांसोबत भगिनी म्हणून सदैव उभ्या राहू’, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात
– बदलापूर अत्याचार प्रकरणाचा मावळातील जनतेकडून तीव्र निषेध, वडगाव मावळ येथे निषेध मोर्चा आणि तहसीलदारांना निवेदन
– कै. सतिश जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महिलाभगिनींना साडी वाटप । Maval News