Dainik Maval News : मावळ तालुक्यातील नाणोली इंदोरी परिसरात शनिवारी (दि.9) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट सदृश्य वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात गरीब मेंढपाळाच्या दोन शेळ्या दगावल्या आहेत. मध्यरात्री दोनवेळा सदर वन्यप्राण्याने हल्ला केला त्यात दोन शेळा दगावल्याचे सदर मेंढपाळ धनगराने सांगितले. हा वन्यप्राणी प्राणी बिबट्या असण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविल आहे. वनविभागाला ही माहिती मिळताच वनपाल व अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मागील कित्येक दिवसांपासून इंदोरी व परिसरातील नाणोली, सुदवडी, जांबवडे, कुंडमळा गावांच्या शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. इंदोरी-नाणोली रस्त्यावरील धनगरवाड्यातील दोन शेळ्या रविवारी पहाटे दोनच्या सुमारास वन्यप्राण्याची ठार केल्या. त्यामुळे, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी रात्री वन्यप्राण्याने दोनदा हल्ला केला, त्यात दोन शेळ्या दगावल्या. वन्यप्राणी बिबट्या होता की नाही हे सदर व्यक्तींनी पाहिले नाही, परंतु त्यांना तशी शंका आहे. मात्र दगावलेल्या शेळ्यांचा आणि घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. येथील धनगाराचा वाडा असून त्यात शेळ्या मेंढ्या आहेत. वन्यप्राणी त्या शेळ्यांच्या शिकारीसाठी येथे आला असण्याचा अंदाज आहे, अशी माहिती वनपाल भारती भुजबळ यांनी दिली.
सदर परिसरात मोठ्या प्रमाणात असलेले ऊस क्षेत्र, ओढे व दाट झाडी ही बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित असल्याने या परिसरात बिबट्यांचा कायम वावर राहिला आहे. मात्र, त्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कामांवर विपरित परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दोन महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याच्या म्हशीच्या गोठ्यावर देखील बिबट्याने हल्ला केला होता. अशा घटना वाढू लागल्याने परिसरातील ग्रामपंचायतींनी बिबट्याना पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाविकासआघाडीचं ठरलं , भाजपाचे ‘ते’ नेते अडचणीत ! बापूसाहेबांसाठी मविआचे कार्यकर्ते सक्रीय, भाजपा कार्यकर्त्यांचा ‘यू टर्न’
– आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांकरिता रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण बांधील : बापूसाहेब भेगडे
– आमदार शेळकेंच्या विकासाचा पुराव्यानिशी पंचनामा करणार : भेगडे । Bapu Bhegade