मावळ तालुक्यातील कातवी येथील इंद्रायणी नदी संरक्षणाबाबत आणि पुलाला संरक्षक कठडे बसवण्याबाबत कातवी ग्रामस्थांतर्फे थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच निवेदन पत्र पाठवण्यात आले आहे. मौजे कातवी (ता. मावळ, जि. पुणे) येथून इंद्रायणी नदी वाहते. या ठिकाणी नदीवर असलेल्या पुलाला संरक्षक कठडे नाहीत आणि संरक्षक जाळीदेखील नाही. त्यामुळे कधीही अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते आणि तसेच अनेकदा घडलेही आहे. तसेच या ठिकाणी इंद्रायणी नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होताना दिसते, याबद्दल ग्रामस्थांतर्फे मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन पाठवण्यात आले आहे. ( Letter To CM Eknath Shinde From Katavi Villagers Maval Taluka Regarding Protection Of Indrayani River And Installation Of Stonework On Bridge )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामस्थांनी केलेल्या अर्जात नक्की काय म्हटलंय?
कातवी गावच्या आजुबाजूच्या परिसरातील नागरिक त्यांच्या घरी होणारे धार्मिक विधीचे निर्माल्य हे राजरोजपणे इंद्रायणी नदीतच फेकून देतात. तसेच पुलावरून घरगुती कचरा देखील नदीत टाकतात. त्यामुळे नदीच्या पाण्याचे प्रदुषण होत आहे. तसेच नदीपात्राच्या पुलाशेजारी कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. सदर परिसरात अनेक हॉटेल्स असून हॉटेलमधील टाकाऊ अन्न देखील अनेक हॉटेल व्यावसायिक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन नदीतच टाकतात, प्रसंगी विचारणा केली असता नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक मुजोरीपणा दाखवून वाद आणि भांडणतंटा करण्यावर येतात.
सदर घाणीमुळे नदीच्या पाण्यावर जलपर्णीचे प्रमाण वाढलेले आहे. काही ठराविक मनुष्यांच्या चुकीमुळे कातवी गावामधून जाणाऱ्या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे अनेकदा नदीचे पाण्यावर फेस दिसून नदीतील मासे व अन्य जलजीव मरण पाऊन नदीच्या कडेला तरंगताना दिसतात. सदर इंद्रायणी नदीचे पाण्याचा पिण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील स्टेशन परिसराला पुरवठा होतो. नागरिक सदरील पाणी पिण्यासाठी वापरतात, परंतू वर नमुद केलेल्या कारणांमुळे नदीचे प्रदुषण प्रचंड प्रमाणावर वाढलेले आहे आणि त्याचा परिणामी पाण्यातून होणारे साथीचे आजार बळावण्याची शक्यता. यातून जिवितहानी सारखे धोकेसुध्दा नाकारता येत नाही.
वरील सर्व परिस्थिती बघता, इंदायणी नदीत टाकण्यात येणारे निर्माल्य, हॉटेलचे उर्वरीत अन्न, यांस मज्जाव करणे, नदीत वाढलेली जलपर्णी काढणेकामी उपायोजना करणे, नदीवर पुलाचे संरक्षक कठडे बसविणे आणि संरक्षक जाळी बसविणे, तसेच सदर नदीमधील पाणी स्वच्छ राहणेबाबत प्रयोजन करणे कामी एम.आर.डी.स्की तळेगाव यांना कारवाई नोटीस बजवून कोणत्याही प्रकारचे केमीकल विसर्जन नदीत करण्यात येऊ नये, याबाबत सबंधित अधिकारी यांना योग्य ते आदेश देण्यात यावे, नदीचे प्रदुषण रोखणेकामी ठोस उपाय योजना करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना कातवी ग्रामस्थांच्या तर्फे नवनाथ दत्तात्रय चव्हाण यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– व्हॉट्सअॅपचा मेसेज ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड-घेरेवारी भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या
– रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
– धक्कादायक! वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून चिंचवडमधील युवकाचा मृत्यू