राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका यांच्या वतीने मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर सातकर यांच्या उपस्थितीत मावळचे आमदार सुनिल शेळके आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांना मावळ तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याबाबत निवेदन देण्यात आले. ( letter to tehsildar vikram deshmukh of maval taluka NCP to get employment for local youth )
मावळ तालुक्याचे राज्य आणि देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. पिण्याचे पाणी आणि विजनिर्मिती साठी स्वातंत्र्य पूर्व काळात मावळ तालुक्यात धरणे झाली आहे. स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरण, शेती, पिंपरी-चिंचवड शहर आणि तीर्थस्थळाच्या पिण्याच्या पाण्यासाठी अनेक धरणे बांधली आहेत. रेल्वे मार्ग, महामार्ग, द्रुतगती मार्ग स्थानिकांनी आपल्या जमीन कवडीमोल भावाने दिले आहेत. संरक्षण खाते, सीआरपीएफ, औद्योगिक वसाहत अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक हक्क उत्पादनासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिले आहे.
मावळ तालुका औद्योगिकीकरणाने जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. लोणावळा खंडाळ्यातील हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस आहेत. मावळ तालुक्यात रोजगाराच्या अनेक संधी आणि सुविधा उपलब्ध असताना स्थानिकांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे निरीक्षण आहे. तळेगाव दाभाडे, टाकवे बुद्रुक, उर्से, लोणावळ्यातील औद्योगीकरणात स्थानिकांना रोजगारात 50 टक्के संधी मिळावी, अशी आमची मागणी आहे.
तसेच लोणावळा खंडाळ्यातील हॉटेल्स व्यवसाय तालुक्यातील फार्म हाऊस येथेही स्थानिकांना आपल्या कुवतीनुसार काम मिळावे, आंदर मावळातील वाहनगाव येथे सुमारे 500 कोटीचे गुंतवणूक असलेल्या महर्षी वैद्यकीय प्रायव्हेट लिमिटेडच्या आयुर्वेदिकशी संबंधित असलेल्या प्रकल्पासह तालुक्यात अनेक ठिकाणी यासारखे अनेक लहान मोठे प्रकल्प आहे. गहुंजे येथील स्टेडियम, पुणे मुंबई दृतगती महामार्गावर असलेल्या सेवा अशा कामातही स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे तालुक्याचे आमदार सुनिल शेळके आणि तहसीलदार यांच्याकडे केली. ( letter to tehsildar vikram deshmukh of maval taluka NCP to get employment for local youth )
यावेळी उपस्थित आशिष ढोरे, सचिन मुऱ्हे, सोमनाथ वाघोले, अतुल मराठे, आशिष बंसल, संदीप खिरेड, भारत अहिवळे, जितेंद्र पानसरे, चेतन थोरवे, स्वप्निल मोडवे, गजानन खरमारे, सुजित सातकर, केदार भवरे, अरविंद पाटील, सुमित गायकवाड, जाफर शेख, भानुदास जांभुळकर, सागर बोडके, स्वामी आदेश वंजारी, रवींद्र चव्हाण, प्रतीक काकरे आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road
– कुरवंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साधना यादव बिनविरोध । Maval Politics