कामशेत – कुजगाव रोडवरील एका घराजवळ आढळलेल्या अजगर जातीच्या सापाला जीवदान देण्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना यश आले आहे. कामशेत भागात अजगर साप नेहमीच आढळून येतो.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य सोन्या वाडेकर, तेजस शिंदे, कार्तिक गायकवाड यांनी कामशेत कुजगाव इथून तब्बल 8 फुटी अजगर साप रेस्क्यू केला. या सापाला रेस्क्यू केल्यानंतर त्याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांना दिली. ( life save an 8 foot python at Kamshet maval )
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रमोद ओव्हाळ, दक्ष काटकर, यश बच्चे, शुंभम आंद्रे, ओमकार कडू, जिगर सोलंकी आदी होते. त्यांनी सापाला सुरक्षितरित्या पकडून सापाची प्राथमिक तपासणी करून वडगांव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या निरिक्षणाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून दिले.
आता पावसात भरपूर साप बाहेर पडतात, तरी नागरिकांनी घरात आणि काम करण्याच्या ठिकाणी काळजी घ्यावी, तसेच साप दिसल्यास कोणत्याही सापाला न मारता त्याला स्वतःहून जाऊ द्यावे किंवा जवळपासच्या प्राणीमित्र किंवा वनविभागाला कळवावे, असे आवाहन निलेश गराडे यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा शहराजवळील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी वर्षाविहारासाठी जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, थेट 144 (1) केलाय लागू
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनचालक आणि प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, लगेच वाचा