Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद आज ( दि. ४ ) रोजी पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली.
गेली अडीच ते तीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. परंतु आता खऱ्या अर्थाने निवडणूका मार्गी लागल्या असून आयोगाने नगरपरिषदा व नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका होतील. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती करिता ही निवडणूक होणार आहे.
246 नगरपरिषदांची ( यापैकी 10 नवीन ) निवडणूक होणार आहे. यातील 236 नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपली आहे. 147 पैकी 42 च्या निवडणुका होत आहेत, त्यात 15 नवीन आहेत. त्यात 27 ची मुदत संपल्याने त्यांचा समावेश आहे. उर्वरित 105 ची मुदत संपलेली नसल्याने त्यांच्या निवडणुका नाहीत.
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम –
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे :
नामनिर्देशन दाखल करण्यास सुरूवात – 10 नोव्हेंबर
नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
नामनिर्देश छाननी कार्यक्रम – 18 नोव्हेंबर
अपिल नसल्यास माघारीचा दिवस – 21 नोव्हेंबर
अपिल असल्यास माघारीचा दिवस – 25 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह व अंतिम यादी जाहीर करण्याचा दिवस – 26 नोव्हेंबर
प्रत्यक्ष मतदान दिनांक – 2 डिसेंबर
प्रत्यक्ष मतमोजणी व निकाल दिनांक – 3 डिसेंबर
निकाल राजपत्रात घोषीत होणार – 10 डिसेंबर
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी

