व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधींचा विजय ‘मोठ्ठा’ ! एकावेळी दक्षिण आणि उत्तरेतून निवडून येणार एकमेव खासदार, ‘ही’ जागा सोडण्याची शक्यता

इंडिया आघाडीच्या या यशात राहुल गांधी यांचा मोठा वाटा आहे. प्रत्यक्ष राहुल गांधी हेही दोन मतदारसंघातून विजयी झाले असून मोठ्या फरकाने त्यांनी बाजी मारली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 5, 2024
in देश-विदेश, मावळकट्टा
Lok Sabha 2024 Result Rahul Gandhi won Wayanad Raebareli

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकांचा निकाल आता जाहीर झाला आहे. देशात पुन्हा एकदा एनडीए आघाडीला बहुमत मिळाले आहे. असे असले तरीही भाजपाला एकहाती सत्ता मात्र मिळालेली नाही. देशात इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली असून त्यातही काँग्रेसच्या जागा सर्वाधिक वाढल्या आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमतात सत्ता स्थापन करेल असा अंदाज होताच, परंतू एक्झिट पोलची आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकाल यात मोठा फरक दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

  • इंडिया आघाडीच्या या यशात राहुल गांधी यांचा मोठा वाटा आहे. प्रत्यक्ष राहुल गांधी हेही दोन मतदारसंघातून विजयी झाले असून मोठ्या फरकाने त्यांनी बाजी मारली आहे. नरेंद्र मोदी यांनीही वाराणसीतून विजयाची हॅटट्रीक केली आहे. असे असले तरीही राहुल गांधी यांचा विजय त्यांच्यापेक्षाही मोठा आहे.

राहुल गांधी यांचा खास पराक्रम ;
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा इंडिया आघाडीचे प्रमुख नेते राहुल गांधी हे उत्तरप्रदेशातील हायप्रोफाईल मतदारसंघातून अर्थात रायबरेलीतून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंग यांचा पराभव केलाय. तसेच राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून देखील विजयी झालेत. भारतात एकाचवेळी दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा दोन टोकांच्या मतदारसंघात विजयी होणारे राहुल गांधी एकमेव खासदार आहे.

मोदींपेक्षाही गांधींचा विजय मोठा ;
नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाखांच्या फरकाने पराभव केला आहे. मोदींच्या या विजयापेक्षाही राहुल गांधी यांचा विजय मात्र मोठा आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी हे तब्बल 4 लाख मतांच्या फरकाने विजयी झालेत. तर वायनाडमध्येही राहुल गांधी तब्बल साडेतीन लाखांच्या फरकाने विजयी झाले आहेत. ( Lok Sabha 2024 Result Rahul Gandhi won Wayanad Raebareli by huge margin over Narendra Modi )

राहुल गांधी कोणती जागा सोडणार ?
राहुल गांधी हे एकाच वेळी दोन ठिकाणी निवडून आले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना एक जागा सोडावी लागणार आहे. नियमानुसार राहुल गांधी एकाच लोकसभेचे प्रतिनिधित्व करू शकतात. त्यामुळे राहुल हे आता दोन्ही विजयी जागेपैकी एक जागा सोडतील. ते नेमकी कोणती जागा सोडणार याबद्दल माहिती समोर आलेली नाही. मात्र, राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघाची जागा सोडू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. रायबरेलीचा वारसा ते प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवू शकतात, अशी चर्चा होत आहे.

अधिक वाचा –
– आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result
– लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra
– अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर


Previous Post

मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी

Next Post

मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lok Sabha 2024 Results NDA meeting at Delhi

मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.