Lok Sabha 2024 Results : लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता केंद्र स्तरावरील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीत घडामोडी वेगाने घडत असून एक महत्वाची माहिती समोर य़ेत आहे. दिल्लीत आज एनडीए आघाडीची महत्वाची बैठक ( NDA meeting at Delhi ) आहेत. या बैठकीनंतर आजच नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, आणि येत्या 8 जून रोजी शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोकसभा निवडणूकांचा निकाल काल, मंगळवारी (दि. 4 जून) जाहीर झाला. एक्झिट पोलच्या विपरीत आणि अत्यंत अनपेक्षित अशा या निकालामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. एनडीए आघाडीला जरी बहुमत मिळाले असले तरीही कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपाच्या जागाही घटल्या आहे. तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांच्या जागांवर एनडीएचं भवितव्य अवलंबून आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या असून त्यांच्याही गोटात सत्ता स्थापनेची चर्चा होत आहे. या सर्व परिस्थितीत भाजपाने आता घाईने काही निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. ( Lok Sabha 2024 Results NDA meeting at Delhi Narendra Modi will become PM for third time )
आज तातडीने एनडीए आघाडीची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीनंतर लगेचच नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. आजच्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या समर्थनाचे पत्र सर्व घटक पक्षांकडून मिळवून राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. त्यानंतर येत्या 8 जूनला हा शपथविधी सोहळा देखील उरकण्याची तयारी सुरु असल्याचे समजत आहे. तसेच कॅबिनेटमध्ये 17 वी लोकसभा भंग करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता लवकरच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ( Narendra Modi will become PM for third time ) घेऊ शकतात.
एनडीए सोबतच इंडिया आघाडीचीही दिल्लीत बैठक होत आहे. इंडिया आघाडीनेही चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली पाहिजे असा मत प्रवाह इंडिया आघाडीत बळावत आहे. त्या जोरावर इंडिया आघाडीच्या हालचाली सुरु असल्याचे समजते. इंडिया आघाडीच्या या हालचाली पाहता भाजपाने कुरघोडी करून लवकर सत्ता स्थापन करण्याचे ठरवल्याची माहिती मिळत आहे.
अधिक वाचा –
– फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा
– आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result
– लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra