व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा

महाराष्ट्रात मागील तीन वर्षांपासून भाजपाने केलेलं फोडाफोडीचं राजकारण आणि हरएक मार्गाने विरोधकांना जेरीस आणल्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागल्याचे दिसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 5, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Lok Sabha Election 2024 Results Maharashtra state

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी कालच्या (दि. 4 जून) ऐतिहासिक निकालाने आता थंडावली आहे. देशात एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत येत असले तरीही इंडिया आघाडीने मारलेली मुसंडी सर्वांसाठी चर्चेची बाब बनली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेने दिलेला कौल हा चर्चेचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात मागील तीन वर्षांपासून भाजपाने केलेलं फोडाफोडीचं राजकारण आणि हरएक मार्गाने विरोधकांना जेरीस आणल्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागल्याचे दिसत आहे.

भाजपा तथापी महायुतीच्या प्रत्येक कृतीला महाराष्ट्रातील मतदारांनी मतांच्या माध्यमातून विरोध केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात महायुतीला मतदारांनी जोरदार चपराक दिली आहे. तर, महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या पारड्यात भरघोस मतांचे दान मतदारांनी टाकले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

राज्यातील एकूण 48 जागांवरचा अंतिम निकाल आता जाहीर झाला आहे. अंतिम निकालाकडे पाहिल्यास महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा महाविकासआघाडी्च्या बाजूने असलेला दिसतो, याची कारणंही अनेक आहेत. महाविकासआघाडी सत्तेवर असताना त्यातील आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी या पक्षात मोठी फुट पडली. या पक्षफुटीमागे भाजपा असल्याचे आता सर्वश्रूत आहे. मतदारांना ही गोष्ट तितकीशी रुचलेली दिसत नाही, हे आताच्या लोकसभा निकालावरून एकप्रकारे स्पष्ट झाले आहे. ( Lok Sabha Election 2024 Results Maharashtra State Mahavikas Aghadi won Mahayuti defeated )

महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी काँग्रेस हा 13 जागांसह राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे, ही गोष्टी सर्वांच्याच नजरेत भरणारी आहे. काँग्रेस – 13, शरद पवार गट – 8, शिवसेना उबाठा – 9 अशी महाविकासआघाडीची एकूण 30 जागांवर विजयी पताका फडकली आहे, तर एक अपक्ष उमेदवार विशाल पाटील हेही मविआकडेच असतील, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

महायुतीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही यंदा भाजपाची झालेली पिछेहाट भाजपासह महायुतीच्या घटकपक्षांनाही धक्का देणारी आहे. भाजपाला यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात अवघ्या 9 जागा मिळाल्या आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. महायुतीत आणि महाराष्ट्रात सर्वात मोठी चपराक मतदारांनी कुणाला लगावली असेल, तर ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. राष्ट्रवादीची राज्यात अवघी एकच जागा निवडून आली आहे. त्यामुळे महायुतीचे राज्यातील बलाबल हे सद्यस्थितीत फक्त 17 इतकेच आहे.

अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra
– अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर

– मोठी बातमी ! पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा शानदार विजय ; धंगेकर, मोरे पराभूत


dainik maval jahirat

Previous Post

आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result

Next Post

मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Lok Sabha Election 2024 Result

मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.