देशभरातील 543 लोकसभा मतदारसंघांची आज (दि. 4 जून) मतमोजणी होत आहे. सर्वच ठिकाणच्या मतमोजणीच्या फेऱ्या आता पूर्ण होत असून जवळपास निकाल निश्चित होऊन समोर येऊ लागले आहे. भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे लोकसभेची निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर प्रतिष्ठेची बनली होती. तसेच तिरंगी लढत होत असल्याने सर्वांचेच या जागेवर लक्ष होते. भाजपाची याठिकाणी एकहाती सत्ता आजवर राहिली आहे. त्यासह मुरलीधर मोहोळ यांच्याही प्रतिमेचा फायदा इथे झाला आणि त्यांचा विजय जवळपास सोप्पा बनला होता. अपेक्षेप्रमाणे1 लाख भारीभक्कम मतांची आघाडी घेऊन मुरलीधर मोहोळ हे विजयी झाल्याची माहिती समजत आहे. ( Lok Sabha Election 2024 Result Updates BJP Candidate Muralidhar Mohol won in Pune Lok Sabha Constituency )
“माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पुणेकरांचे आभार मानतो. महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते यांचे आभार मानतो. पुण्याला सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी काम करेन. पुणेकरांनी विकासाला, विचारांना मतदान केले.” – मुरलीधर मोहोळ (विजयी उमेदवार)
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं