लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर होत आहेत. आज (दि. 4 जून) देशातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँट की टक्कर पाहायला मिळत आहे. महायुतीकडून यावेळी 45 पारचा नारा देण्यात आला होता. परंतू आता प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी प्राथमिक कलांनुसार राज्यात महायुतीची ताकद असल्याचे दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्यातील एकूण 48 जागांपैकी सद्यस्थितीत 27 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर 20 ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि 1 जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी अत्यंत खास होती. याचे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे.
महाविकासआघाडीतील शिवसेना उबाठा पक्षाची मशाल महाराष्ट्रांत चांगलीच उजळताना दिसत असून 9 जागेवर ठाकरेंचे उमेदवार आघाडीवर आहे. शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी देखील जाोरात वाजत असून 6 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत तर काँग्रेसने महाराष्ट्रात जोरदार कमबॅक केलेले आहे. काँग्रेसचे 10 उमेदवार आघाडीवर आहे. दुसरीकडे महायुतीत 20 पैकी एकट्या भाजपाचे 15 उमेदवार आघाडीवर आहेत.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निकाल Live : श्रीरंग बारणे तब्बल 20,690 मतांनी आघाडीवर, संजोग वाघेरे पिछाडीवर, एका क्लिकवर पाहा आकडेवारी । Maval Lok Sabha Result
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– बालेवाडी येथे मतमोजणी ! निकालासाठी जाणारे कार्यकर्ते आणि सामान्यांसाठी महत्वाची अपडेट, वाहतूक मार्गात मोठा बदल, जाणून घ्या
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार