व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गोविंदा आला.. गोविंदा आला.. पण ज्यांच्यासाठी आला त्यांचे नावच विसरला ! ‘आदरणीय’ बोलून विषय संपवला । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता सभा, रॅल्या, बैठका यांचा जोर दिसून येणार आहे. महायुतीकडून याची सुरुवात झाल्याचेही दिवस आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 6, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
govinda forgot name of candidate shrirang barne

Photo Courtesy : FB / Shrirang Barne


मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता सभा, रॅल्या, बैठका यांचा जोर दिसून येणार आहे. महायुतीकडून याची सुरुवात झाल्याचेही दिवस आहे. रविवारी (दि. 5 मे) प्रख्यात अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचार रॅली काढली. परंतू या रॅलीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र जे काही घडलं त्याची चर्चा आता देशस्तरावर होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रविवारी (दि. 5 मे) रोजी संध्याकाळी लोकप्रिय हिंदी अभिनेता गोविंदा याच्या हस्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागे हे निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभानंतर पिंपरी कॅम्प आणि पिंपरीगाव भागात गोविंदा याचा रोड शो झाला. तदनंतर गोविंदा आणि श्रीरंग बारणे आणि अन्य मान्यवर नेते यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना गोविंदा उमेदवार श्रीरंग बारणे यांचे नाव विसरल्याचे दिसून आले. ( lok sabha elections 2024 campaigner actor govinda forgot name of maval candidate shrirang barne )

नेमके काय घडले?
झालं असं की, गोविंदाच्या उपस्थितीत एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत गोविंदा श्रीरंग बारणे यांनी केलेल्या कामांचा गौरव करणार हे ठरलेले होते. मुळात गोविंदा सारखा स्टार प्रचारक त्यासाठीच बोलावला होता, हे काही वेगळे सांगायला नको. परंतू मुंबईहून एवढ्या दूर मावळात गोविंदा ज्यांच्यासाठी आला होता, त्यांचे नावही त्याला ठावूक नव्हते किंवा तो विसरला, हे सर्वांच्या लक्षात आले. कारण पत्रकार परिषदेत गोविंदा जेव्हा बोलू लागला, तेव्हा सुरुवातीला त्याने फक्त ‘आदरणीय’ एवढाच शब्द उच्चारला. आपण ज्या उमेदवारासाठी आलोय, त्याचे नाव आपल्याला लक्षात नसल्याचे गोविंदाच्या ध्यानी आले आणि त्याने तेव्हा शेजारी बसलेल्या आमदार उमा खापरे यांना उमेदवाराचे नाव विचारले, त्यानंतर उमा खापरे यांनी गोविंदाला ती माहिती दिली. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

अधिक वाचा –
– ‘मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहिल’ – आमदार सुनिल शेळके
– म्हाळूंगे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात गावठी दारूसह 2 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त । Pune Crime
– पुणे जिल्ह्यात भरारी पथकाद्वारे अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे, गावठी दारूचे रसायन आणि मुद्देमाल जप्त । Pune News


Previous Post

मावळ लोकसभेत महायुतीत खदखद, त्यामुळे थेट दिल्लीतून आलंय पथक ? पाहा काय झालं या पथकाचं… । Maval Lok Sabha

Next Post

मावळ लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
voting

मावळ लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
Provide funds to solve problems in Dehu Road Cantonment Board MP Shrirang Barne demand to Defense Department

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील समस्या सोडवण्यासाठी निधी द्या ; खासदार श्रीरंग बारणे यांची संरक्षण विभागाकडे मागणी

March 21, 2026
Maval MLA Sunil Shelke met new Commissioner of PMRDA Abhijeet Chaudhary

लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट

March 21, 2026
Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.