लोकसभा निवडणूकीदरम्यान निवडणूक कामकाजासाठी वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्याने पीएमपीएमएल प्रशासनाला भरघोस नफा मिळाला आहे. नेहमी तोट्यात असणारी ही वाहतूक व्यवस्था सध्या मालामाल झाल्याचे दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात मतदान झाले. दिनांक 7 मे रोजी बारामती आणि दिनांक 13 मे रोजी मावळ, शिरूर आणि पुणे या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. या दरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांची वाहतूक आणि ईव्हीएम यंत्रांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीएमएल बस वापरण्यात आल्या. ( Lok Sabha Elections PMPML Administration 1 crore 57 lakh profit )
निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक कर्मचारी आणि मतदान प्रक्रियेमध्ये मतपेट्या वाहून नेण्यासाठी पीएमपीएमएलकडून एकूण 931 गाड्या भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातून पीएमपीएमएल प्रशासनाला तब्बल 1 कोटी 57 लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे : महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान – अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार
– वाचकांच्या प्रतिक्रिया : ‘सुधारणा हवी पण नियोजनबद्ध काम व्हावे.. तळेगाव स्टेशन येथील राडारोडा रेल्वे प्रवाशांसाठी ठरतोय घातक’
– बेगडेवाडी स्थानकावर रेल्वेतून उडी मारून आरोपी पसार, पोलिसांकडून शोधाशोध सुरु । Talegaon Dabhade