Dainik Maval News : आपला विद्यार्थी आपल्या जीवनात जेव्हा शिक्षणाच्या जोरावर कर्तृत्वाचा ठसा उमटेल व नाव जगात उंचावेल तेव्हा शिक्षकाचे काम बघितले जाईल व येणाऱ्या भविष्यातील विद्यार्थ्यांना घडवताना शिक्षकांनी नविन वेगवेगळ्या पध्दतीने शिकवण्याचे काम शिक्षकांचे आहे असे मत प्रमूख पाहुणे डाॕ दिपक शहा यांनी तळेगाव येथे शिक्षक उदबोधन सभेला व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव कै गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांंच्या ९८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संस्थेतील शिक्षकांसाठी नूतन काॕलेज आॕफ इंजिनिअरिंग व रिसर्च अभियांत्रिकी काॕलेज तळेगाव दाभाडे सभागृह येथे उदबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व पैसा फंड काच कारखान्याचे अध्यक्ष दिपक शहा, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के,संचालक सोनबा गोपाळे,महेशभाई शहा, यादवेंद्र खळदे, विनायक अभ्ययंकर,शंकर नारखडे आदी उपस्थीत होते.
यावेळी संस्थेच्या वतीने शाळेतील शिक्षकांना व शाळेला ते करत असलेल्या चांगल्या उपक्रमाला प्रेरणा मिळावी यासाठी संस्थेचे वतिने दरवर्षी दिले जाणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकमान्य टिळक यांंच्या नावाने दिला जाणारा “आदर्श शाळा” २०२२-२३ व २०२३-२४ अनुक्रमे कै मामासाहेब खांडगे इंग्लिश मेडियम स्कुल तळेगाव दाभाडे तर कार्ला येथील उपक्रमशील शाळा श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज काॕलेज आॕफ काॕमर्स तसेच संस्थेचे संस्थापक चिटणीस कै गुरुवर्य आण्णासाहेब विजापूरकर यांंच्या नावाने दिला जाणारा “आदर्श शिक्षक” पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ साठी कार्ला शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश किसन इंगुळकर व इंजनिअरिंग काॕलेजचे प्राचार्य विलास वासुदेव देवतारे हे पुरस्कराचे मानकरी ठरले.तर “आदर्श शिक्षेके-तर कर्मचारी” पुरस्कार इंदोरी प्रगती विद्या मंदिर इंदोरी शाळेतील सेवक गुलाब वामनराव ढोरे तर नूतन काॕलेज आॕफ इंजनिअरिंग काॕलेजच्या वरीष्ठ लेखापाल शुभदा राजेंद्र जाधव यांना प्रदान करण्यात आला.
तसेच संस्थेच्या विविध शाळेतील प्राथमिक विभाग चौथी, माध्यमिक विभाग दहावी व उच्च माध्यमिक बारावी व इंजिनियरिंग काॕलेज मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थांंचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक व्यक्त करताना सचिव संतोष खांडगे म्हणाले कि,संस्थेला ११६ वर्षाचा इतिहास असून या कालखंडात अनेक विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबवून विद्यार्यथ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातात यामध्ये प्लॅस्टिक मुक्तीसाठी कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी या उपक्रमाअंतर्गत १० हजार पिशवी विद्यार्थी व शिक्षकांना वाटप करण्यात आल्या तसेच एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशीच १० हजार विद्यार्थ्यांना देशी रोपे वाटप करण्यात आली.
अध्यक्षीय भाषण करताना संस्थेचे अध्यक्ष म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी अद्यावत ज्ञान संपादन करुन शिक्षण देणे गरजेचे आहे कारण तयार होणारा विद्यार्थी हा उज्वल भारताचा नागरिक होणार आहे तर सुरेश साखवळकर यांनी संस्थेच्या इतिहास कसा आहे याची माहिती दिली. या कार्यक्रमात संस्थेची संपूर्ण शैक्षणिक माहिती देणाऱ्या “समर्थांकुर ” या पुस्तकाचे आणि मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलच्या “वनोद्यान ” पुस्तकाचेही समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. तसेच संस्थेने गतवर्षी पासून शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये उत्कृष्ट हस्तलिखित पुरस्कार कान्हे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाला मिळाला.
प्रभा काळे आणि श्रीमती दुर्गा भेगडे यांनी सूत्रसंचालन केले.संस्थेचे संचालक विनायक अभ्यंकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन नवीन समर्थ विद्यालयाच्या प्राचार्या वासंती काळोखे, पर्यवेक्षक शरद जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. ( Lokmanya Tilak Adarsh School Award to Ekvira Vidya Mandir and Mamasaheb Khandge School )
अधिक वाचा –
– लोणावळेकरांनो काळजी घ्या, पावसाचा जोर वाढलाय, यंदाच्या मोसमात 4000 मिलिमीटर पाऊस पूर्ण, वाचा अधिक । Lonavala Rain Updates
– मावळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इन्कमिंग, ग्रामीण भागातील अनेकांचा पक्षप्रवेश, शरद पवारांची घेतली भेट
– मोठी बातमी ! पावसाचा जोर प्रचंड वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, पवना नदीपात्रात 7070 क्युसेक विसर्ग सुरू । Pavana Dam News