लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्यांविरोधात आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणुन दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी कामशेत पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे कुसगाव गावात एका पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये काही इसम हे अवैधरित्या जुगार मटका खेळत असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यानंतर सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभाग आणि कामशेत पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने सापळा रचून केलेल्या संयुक्त कारवाईत मौजे कुसगाव (ता. मावळ, जि. पुणे) गावाच्या हद्दीत शशिकांत शिंदे यांच्या कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये एकूण सात इसम हे पत्त्याचा जुगार खेळताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेऊन जुगाराच्या डावावरील रोख रक्कम, मोबाईल फोन, वापरलेली वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण 6,36,810 (अक्षरी सहा लाख छत्तीस हजार आठशे दहा रूपये) एवढ्या किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर बाबत कामशेत पोलीस स्टेशन इथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ( lonavala and kamshet police raid gambling den in kusgaon village 7 people detained )
पुढील तपास कामशेत पोलिस स्टेशनचे पोसई शुभम चव्हाण करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी – लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शुभम चव्हाण, पोलिस हवालदार अंकुश नायकुडे, पोलिस नाईक राजु लांडे, पोलिस शिपाई अंकुश पवार, पोलिस शिपाई अमोल ननवरे, पोलिस शिपाई पवन डोईफोडे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात मनसे आक्रमक! रेल्वेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनसैनिकांचे रेल रोको आंदोलन
– मावळमधील कशाळ व भोयरे गावात मंगळवारी, तर कल्हाट व निगडे गावात बुधवारी ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ आयोजन
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा ब्लॉक; पाहा कुठे आणि किती वाजता असेल ब्लॉक