व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात मनसे आक्रमक! रेल्वेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनसैनिकांचे रेल रोको आंदोलन

अनेक प्रलंबित मागण्यासांठी लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (सोमवार, दि. 11 डिसेंबर) रेल रोको आंदोलन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 11, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
MNS-rail-roko-lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा ते पुणे दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना लोणावळ्यात थांबा देण्यात यावा, यासह अनेक प्रलंबित मागण्यासांठी लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (सोमवार, दि. 11 डिसेंबर) रेल रोको आंदोलन करण्यात आले. मनसैनिकांनी थेट लोणावळा रेल्वे स्थानकात घुसून रेल रोको आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर उतरून काही मिनिटे डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. मनसे कार्यकर्त्यांना बाजूला करताना लोणावळा पोलिसांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे ते लोणावळा लोकलच्या फेऱ्या 11 ते 3 या वेळेत सुरु कराव्यात. एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळा शहरात असावा ह्या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. लोणावळा शहरासह मावळ तालुक्यातील अन्य शहरे आणि गावांतून पुणे शहरात दररोज हजारो नागरिक जात असतात. तसेच लोणावळा शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षणीय असते. लोणावळा हे पर्यटन क्षेत्रही आहे. त्यामुळे अनेकदा पर्यटकांकडून रेल्वेचा मार्ग पत्करला जातो. ( Maval Taluka Big News MNS Party Workers Rail Roko Agitation At Lonavala Station )

परंतू, अनेक महत्वाच्या एक्सप्रेस गाड्या लोणावळ्यात थांबत नाही. तसेच कोविडपासून दुपारची लोकल सेवा बंद आहे. लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थी, कामगार, महिला-विद्यार्थीनी, सामान्य नागरिक, वृद्धांना तासन् तास रेल्वेची वाट पाहावी लागते. लांब पल्ल्याच्या कित्येक एक्सप्रेस गाड्याही लोणावळ्यात थांबा घेत नाहीत. सकाळी दहा नंतर थेट तीन वाजता लोणावळा – पुणे लोकल आहे. या सर्व गोष्टींनी नागरिक त्रस्त असून मागील वर्षभरापासून याबद्दल विविध संघटना आवाज उठवत आहे. परंतू, त्याचा काहीही परिणाम होत नसल्याने अखेर हे पाऊल उचलावे लागल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– वीज बिलावरील नाव बदलायचंय? अधिकारी – वायरमन अनावश्यक पैसे मागतायेत? ‘या’ नंबरवर करा तक्रार, लगेच होईल कार्यवाही
– मावळमधील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत; लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप
– पवना धरणग्रस्त आज पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी रोखणार; पवनानगरमधून सुरु होणार मोर्चा


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील कशाळ व भोयरे गावात मंगळवारी, तर कल्हाट व निगडे गावात बुधवारी ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ आयोजन

Next Post

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना मिळणार आकर्षक भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sharad-pawar-birthday

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना मिळणार आकर्षक भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.