Dainik Maval News : पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शालेय स्तरावर विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून विविध स्तरानुसार स्पर्धा होत आहेत. मावळ पंचायत समिती व लोणावळा बीट स्तरावरील कला महोत्सव प्राथमिक शाळा कार्ला येथे तर, क्रीडा महोत्सव एकविरा विद्या मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी नानासाहेब शेळकंदे, लोणावळा बीट मधील केंद्रप्रमुख सुहास विटे, मुकूंद तनपुरे, अमोल चव्हाण, प्राचार्य संजय वंजारे, मुख्याध्यापक सुभाष भानुसघरे, तृप्ती गाडीलकर, संजय जगताप, संजय हुलावळे यांंच्या उपस्थितीत करण्यात आले.
वेहरगाव, कुसगाव, भाजे केंद्रातील केंद्रस्तरावर विजयी झालेल्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. सांघिक लोकनृत्य, भजन स्पर्धा, प्रश्न मंजुषा, कविता पाठांतर, लंगडी, बडबड गीते, वैयक्तिक धावणे, बुद्धीबळ, वक्तृत्व, वेशभुषा, उंचउडी, गोळा फेक, लांब उडी, थाळी फेक अशा स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या.
लोकनृत्य स्पर्धेत डोंगरगाव व औंढे शाळा, भजन स्पर्धेत ताजे शाळा, प्रश्नमंजुषा स्पर्धेत वेहरगाव व भाजे शाळा, लंगडी स्पर्धेत पिंपळोली व ताजे शाळा, कविता गायन स्पर्धेत औंढोली व वेहरगाव शाळा, बडबड गीत स्पर्धेत शिलाटणे शाळा अशा सर्व शाळांनी प्रथम क्रमांक मिळवले. वैयक्तिक स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी उत्तम कलागुणांचे प्रदर्शन केले. यशस्वी विद्यार्थांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक सुभाष भानुसघरे यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी ; आरपीआयचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन
– परभणी घटनेच्या निषेधार्थ पवनानगर बंद ! आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी । Pavananagar
– बनावट घड्याळ विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल, देहूरोड येथील घटना । Maval Crime