Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद प्रभाग निहाय सोडत बुधवारी (दि. ८ ) सकाळी ११ वाजता प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेत 13 प्रभाग असून 27 सदस्य संख्या आहे. त्यातील पहिले 12 प्रभाग 2 सदस्य संख्या असलेले व तेरावा प्रभाग 3 सदस्य संख्या असलेला असणार आहे.
प्रभाग आरक्षण सोडतीनंतर चार प्रभागात अनुसूचित जाती, एका प्रभागात थेट अनुसूचित जमाती व सात प्रभागात नागरिक मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 27 जागांपैकी 13 जागांवर महिला आरक्षण असणार आहेत. लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी ( 3, 4, 8, 9 ) हे चार प्रभाग आरक्षित झाले असून अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक 11 आरक्षित झाला आहे. ( Lonavala Municipal Council Election )
नागरिकांचा मागास वर्ग महिला यासाठी 4 प्रभाग आरक्षित आहेत तर तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला यासाठी असणार आहे. सर्वसाधारण पैकी 7 जागा महिलांसाठी असून 8 जागा सर्वसाधारण असणार आहेत. शालेय विद्यार्थी शिवम खंडाळे व पूजा वाघ यांच्या हस्ते आरक्षण चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
लोणावळा नगर परिषद : प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे,
प्रभाग क्र. 1 – न्यू तुंगार्ली
(अ) – ओबीसी (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 2 – तुंगार्ली गावठाण
(अ) – ओबीसी सर्वसाधारण
(ब) – महिला
प्रभाग क्र. 3 – वळवण
(अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
(ब) – महिला
प्रभाग क्र. 4 – रेल्वे विभाग
(अ) अनुसूचित जाती (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 5 – नांगरगाव
(अ) सर्वसाधारण
(ब) – महिला
प्रभाग क्र. 6 – भांगरवाडी 01
(अ) ओबीसी (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 7 – भांगरवाडी 02
(अ) – ओबीसी
(ब) – महिला
प्रभाग क्र. 8 – लोणावळा बाजार
(अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
(ब) – महिला
प्रभाग क्र. 9 – लोणावळा गावठाण
(अ) अनुसूचित जाती (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 10 – गवळीवाडा
(अ) – ओबीसी (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 11 – खंडाळा
(अ) अनुसूचित जमाती (महिला थेट)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 12 – जुना खंडाळा
(अ) – ओबीसी (महिला)
(ब) – सर्वसाधारण
प्रभाग क्र. 13 – भुशी रामनगर
(अ) – ओबीसी (थेट)
(ब) – महिला
(क) – महिला
निवडणूक कार्यक्रमांनुसार आज (दि. ९ ) प्रारूप आरक्षण रचना जाहीर करण्यात येणार असून 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागरिकांना या आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना देता येणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर

