लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेहेरगाव येथील कंजारभट वस्ती जवळील एका बेकायदेशीर गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकला आहे. तसेच कारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचे रसायन नष्ट केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार वेहेरगाव गावच्या हद्दीत देवकरवस्ती, कंजारभट वस्ती येथील माळरानात ओढ्याच्या कडेला एक 34 वर्षीय महिला (रा. वेहेरगाव, कंजारभट वस्ती, ता. मावळ) हिच्या मार्फत बेकायदेशीररीत्या गावठी दारू बनविणारी हातभट्टी चालवली जात होती. पोलिसांना याची खबर लागताच पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली भारत भोसले यांच्या दलाने घटनास्थळी छापा टाकला. ( lonavala police raid illegal gavthi liquor factory )
घटनास्थळी पोलिसांना गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे 200 लीटर मापाच्या 12 प्लास्टिक ड्रममध्ये 1,20,000 रुपये किमतीचे 2400 लिटर कच्चे रसायन आढळून आले. सदरचे सर्व रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. तसेच याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल केतन तळपे यांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– मावळात वनविभागाला प्रथमच स्वतंत्र रेस्क्यू व्हॅन, अधिकारी-कर्मचारी आनंदित – पाहा व्हिडिओ
– पवनमावळात एसआरटी तंत्रज्ञान रुजवणारे कृषी सहाय्यक विकास गोसावी यांना ‘स्टार प्रचारक अधिकारी’ पुरस्कार