लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकरल्यापासून अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे देवघर येथे अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीवरून आयपीएस सत्यसाई कार्तीक यांनी सोमवारी (दि. 4 मार्च) त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. तेव्हा मौजे देवघर येथील वेताळबाबा टेकडीवर एका झाडाखाली मोकळ्या जागेवर पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये,
1) अंकुश लक्ष्मण देशमुख (वय 35, रा.देवघर)
2) सुशील धोंडिबा धनकवडे (वय 65, रा. तुंगार्ली)
3) मारुती भैरू देशमुख (वय 68, रा. देवघर)
4) मोहन गबळाजी येवले (वय 60, रा. वाकसई)
5) काळूराम तिंबक देशमुख (वय 68, रा. देवघर)
6) रमेश मारुती रोकडे (वय 59, रा. देवघर)
7)दिलीप पद्माकर देशमुख (वय 46, रा. देवघर)
हे पैशांवर जुगार खेळताना मिळून आल्याचे फिर्यादीत नमुद आहे. तसेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून रोख रक्कमेसह एकूण 94,400 रुपये (अक्षरी चौऱ्यानौ हजार चारशे रुपये) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ( Lonavala rural police action on gambling den in Deoghar Village case registered against 9 persons )
नमूद कारवाई वेळी पोलिसांची चाहूल लागताच 8) अशोक रोकडे (रा. देवघर) आणि 9) चंदू मडके (रा. वाकसई) हे झाडीझुडपांचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेबाबत पोलिस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न 78/24 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे कलम 12 (अ) अन्वये नमूद 9 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दर्शन दुगड, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोलिस हवा नितेश (बंटी) कवडे, पोलिस हवालदार अंकुश नायकुडे, पो.कॉ. सुभाष शिंदे, पो.कॉ. गणेश येळवंडे, पो.कॉ. राहीस मुलानी, पो.कॉ. वाळके यांच्या पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रस्ता आणि ओपन जिमचे भूमिपूजन संपन्न । Pimpri Chinchwad
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान : अंतिम निकाल जाहीर, शासकीय गटात साखरा शाळा प्रथम, खाजगी गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूलची बाजी
– मावळ दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खेळी, खासदार बारणेंना होणार फायदा । Maval Lok Sabha