शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन एका उत्तर भारतीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आपटी धामणदरा इथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाखल फिर्यादीवरुन आपटी धामणदरा येथील दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच मृत व्यक्तीच्या नावा गावाची संपूर्ण ओळख माहिती नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. ( Lonavala Rural Police Station Murder of an unidentified North Indian in Apti Dhamandara Village )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणदरा येथील स्माशनभूमीच्या बाजूला असलेल्या ओढ्यामध्ये एक मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचा तपास केला असता त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या खुनाच्या तपासात आपटी धामणदरा येथील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर भा.दं.वी. कलम 302, 34, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताची संपूर्ण ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे नाव रमेश असे असून तो उत्तर भारतीय असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश माने यांनी दिली. तसेच, मृताबद्दल काही माहिती असल्यास लोणावळा पोलिसांशी संपर्क ( 02114 273036 ) असे आवाहन करण्यात आले आहे.
मृताची माहिती – नाव : रमेश, काम : गवंडी, कामाचे ठिकाण : लोणावळा, उत्तर भारतीय आहे.
अधिक वाचा –
– कासारसाई धरणाबाबत मावळ – मुळशी तालुक्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आमदार शेळकेंसोबत संयुक्त बैठक
– पवनामाई फेसाळली, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ; संबंधितांवर कठोर कारवाईची खासदार बारणेंची मागणी
– पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल; अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या, मावळमध्येही ‘या’ पोलिस ठाण्यात नवीन अधिकारी