व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News

आमदार सुनील शेळके यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 20, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Park Garden Image

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो उद्यान योजनेची घोषणा केली आहे. यानुसार, राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येणार आहेत.

राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगरपंचायत, नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातील दोन नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींना प्रत्येकी एक कोटी निधी उपलब्ध झाला आहे.

मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषद, तळेगाव दाभाडे नगर परिषद, वडगाव नगर पंचायत आणि देहू नगर पंचायत या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता हा निधी उपलब्ध झाला असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. या निधीतून शहरांतील उद्यान विकासाला चालना मिळणार आहे. तसेच नागरिकांना विरंगुळ्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होणार आहे.

या निधीबद्दल बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “मावळ तालुक्यातील शहरी भागांच्या विकासासाठी हा निधी महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दर्जेदार सुविधा मिळतील. मावळच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”

आमदार शेळके यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले. हा निधी केवळ मनोरंजनाचे साधन नसून, लोणावळ्यातील सामाजिक आणि आरोग्य संवर्धनाचे केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News 


Previous Post

मावळात प्रथमच भव्य शारदीय नवरात्र उत्सव ; प्रशांत भागवत यांच्या पुढाकारातून आयोजित सोहळ्याची जय्यत तयारी । Navratri 2025

Next Post

पोळा । बैलपोळा । बेंदूर : का साजरा केला जातो बैलपोळा? पोळा सणाची पौराणिक कथा आणि महत्व – जाणून घ्या । Bail Pola

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pola Bailpola Bendur festival Why is Bail pola celebrated mythological story of Pola festival know in marathi

पोळा । बैलपोळा । बेंदूर : का साजरा केला जातो बैलपोळा? पोळा सणाची पौराणिक कथा आणि महत्व - जाणून घ्या । Bail Pola

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.